MLA Rohit Pawar : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या !

आ. रोहित पवारांची मागणी : मराठवाड्यात ३५ हजार कोटींच्या नुकसानीचा दावा
MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या !file photo
Published on
Updated on

Provide assistance of ₹50,000 per hectare to farmers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, ही परिस्थिती १९७२च्या दुष्काळापेक्षाही गंभीर असल्याचा दावा बुधवारी (दि. २३) आमदार रोहित पवार यांनी पत्रकारशी बोलताना केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार, तर शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी. पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

MLA Rohit Pawar
Drought report : दुष्काळाचा अहवाल दोन दिवसांत शासनाला पाठवणार

मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी बुधवारी आ. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मराठवाड्यातील जिल्हाध्यक्षांसह विभागीय आयुक्तांची भेट घेऊन नुकसानीची माहिती सादर केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मराठवाड्यात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रत्येक नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ हजार ८०० कोटी, जालन्यात ५ हजार १५० कोटी, बीडमध्ये ६ कोटी, लातूरमध्ये ३ हजार ८०० कोटी, धाराशिवमध्ये ३ हजार २५० कोटी, नांदेडमध्ये साडेपाच हजार कोटी, परभणीत ४ हजार कोटी आणि हिंगोलीत २ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा केला.

तसेच अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित पीकविमा भरपाई मिळालेली नाही. पीक कापणी प्रक्रियेतही अन्याय होत असल्याचा आरोप पवार यांनी केला. बीडमध्ये सुमारे ८०० कोटी, तर धाराशिवमध्ये २०२२ मधील सुमारे ६०० कोटी रुपये विम्याचे प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीची भरपाईही पुरेशी मिळाली नसताना आता अवर्षणाचे संकट उभे ठाकल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्यांचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांच्या मागणीनंतरच निर्णय का घेण्यात आला, असा सवाल त्यांनी केला. यावर कर्नाटकातील मदतीचा दाखला देत महाराष्ट्रातही ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. निर्णयप्रक्रियेत अधिकारांचे केंद्रीकरण झाल्याची टीकाही त्यांनी केली.

नुकसानीची आकडेवारी आयुक्तांकडे मराठवाड्यातील शेतीचे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि त्याआधारे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

MLA Rohit Pawar
Sambhajinagar News : किंग इज बॅक' म्हणत जामिनावर सुटलेल्या आरोपीची रॅली

बीडमध्ये ८००, धाराशिवमध्ये ६०० कोटींचा मुद्दा

पीकविम्याची रक्कम वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला. बीड जिल्ह्यात सुमारे ८०० कोटी रुपये आणि धाराशिव जिल्ह्यात २०२२ मधील सुमारे ६०० कोटी रुपये प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. पीक कापणी प्रक्रियेतही अनियमितता होत असल्याचा आरोप करत विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

आज बीडमध्ये आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याची घोषणा पवार यांनी केली. त्याची सुरुवात आज गुरुवारी (दि. २४) बीडमधून होणार आहे. निवडणूक आचारसंहिता आंदोलन रोखण्यासाठी लागू केली का, असा सवाल करत २७ सप्टेंबरच्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांपेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत महत्त्वाची असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news