A unique pattern of simplification of revenue services
छत्रपती संभाजीनगर : सर्व प्रकारच्या महसुली सेवा सामान्य नागरिकांना सहज मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली महसुली सेवा सुलभीकरणाचा नवीन पॅटर्न उदयाला आला आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी गेल्या काही महिन्यांत फेरफार अदालत, शेतरस्ते मोकळे करण्याचे अभियान, जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी, अधिकारी शेतीच्या बांधावर, स्मशानभूमी समस्या निवारण अभियान, सर्व कार्यालयांमध्ये तक्रार पेट्या, गाव तिथे वड, जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांसाठी कट्टा यासारखे एक ना अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले.
वाचन त्यांच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांची ससेहोलपट थांबली आहे. महसूल दिनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या या अनोख्या उपक्रमांचा दै. पुढारीने घेतलेला हा आढावा.
जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातील च तालुका पातळीवरील नागरिक मोठ्या संख्येने तक्रारी घेऊन येतात. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च होते. महणून आता जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी हा अभिनव उपक्रम राबविला. या अंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे आठवड्यातून दोन दिवस दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व तहसील कचेरीतून नागरिकांचे गाण्हाणे ऐकत आहेत.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहिलेली नाही. त्याऐवजी, तालुकास्तरावरच दूरहष्यप्रणाली (व्हीसी) माध्यमातून नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येत आहे. प्रत्येक सोमवारी आणि गुरुयारी दुपारी ४ ते ६ या वेळेत जिल्हाधिकारी व्हीसीच्या माध्यमातून तक्रारीची सुनावणी घेत आहेत.