Sambhajinagar Crime News : दर्गा चौकात कार फोडणारा निवृत्त पोलिसाचा पोरगा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : दर्गा चौकात कार फोडणारा निवृत्त पोलिसाचा पोरगा

साडूही पोलिस, कारमध्ये पोलिसांची कॅप, फायबर लाठी

पुढारी वृत्तसेवा

A retired policeman's son broke a car at Darga Chowk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहानूरमिया दर्गा चौकात रविवारी रात्री कारला ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून निवृत्त पोलिसाच्या मुलाने फायबरच्या लाठीने तरुणाच्या कारच्या काचा फोडून राडा केला. शिवीगाळ करून भररस्त्यात दहशत माजवली. अरविंद जाधव (४५, रा. भानुदासनगर) असे आर-ोपीचे नाव आहे. त्याचा साडूही फुलंब्रीला पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी ऋषिकेश तुळशीराम शिंदे (३२, रा. चित्तेगाव) याच्या तक्रारीनुसार, त्याचा गॅस एजन्सीचा व्यवसाय आहे. त्याचा मावस भाऊ अमर राजेंद्र शिंदे (रा. सिग्मा हॉस्पिटलच्या बाजूला) याने गेल्यावर्षीच नेक्सॉन कार खरेदी केली आहे. ती कार ऋषिकेश वापरतो. तर अमर पुण्यात नोकरीला आहे. शनिवार रविवार सुटी असल्याने तो चित्त्-ोगावला आला होता.

रविवारी रात्री ट्रॅव्हल्सने पुण्याला जाण्यासाठी ऋषिकेशने अमरला दर्गा चौकात सोडून परत निघाला. तेव्हा अचानक क्रेटा कार (एमएच-२०-जीव्ही-७००७) चालकाने त्याच्या कारसमोर येऊन अडविले. त्यातून दोन जण लाठ्या घेऊन उतरले. हवेत लाठ्या फिरवून आरडाओरड करून कोण आहे रे तू? आम्हाला ओव्हरटेक करतो काय?

असे म्हणून ऋषिकेशच्या कारची समोरच्या काचेवर लाठी मारून काच फोडली. चालक बाजूची काच आणि मागची काच फोडून शिवीगाळ सुरू केली. मला कट मारतो का? मी कोण आहे तुला माहीत आहे का? अरविंद जाधव म्हणतात मला, काय करायचे ते करून घे, सोबतच्या तरुणाला चल रे बस गाडीत म्हणून दोघे जण बसून निघून गेले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॅशबोर्डवर पोलिस कॅप ठेवण्याचा ट्रेंड

चारचाकी वाहनात डॅशबोर्डवर पोलिस अधिकाऱ्यांची कॅप ठेवण्याचे प्रकार सध्या सर्रासपणे दिसून येत आहे. वाहतूक पोलिस कॅप पाहून दंडात्मक कारवाई करणे टाळतात. हा यामागील उद्देश असतो. तसेच काही राडा झालाच तर कॅप आणि पोलिस लिहिलेले नाव पाहून समोरचा दबकून राहतो. जाधवच्या क्रेटामध्येही कॅप आणि लाठीही होती, हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT