

छत्रपती संभाजीनगर / वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : मित्रासोबत गौताळा येथे गेल्यानंतर तेथून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या तरुण उद्योजकाचा धुळे-सोलापूर महामार्गाच्या करोडी टोल नाक्याजवळ पुलाखाली मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली मयत आहे. सागर सागर परळकर रामभाऊ परळकर (३६, रा. नक्षत्रवाडी) असे मृत उद्य-जिकाचे नाव असून, ही घटना सोमवारी (दि.२१) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली.
सोलापूर महामार्गावर करोडी टोल नाक्याजवळ असलेल्या पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक रेखा लोंढे, उपनिरीक्षक आयुब पठाण, दादासाहेब बनसोडे, महेश घुगे, खुशाल पाटील, ज्ञानेश्वर कोळी, साईनाथ सोनवणे, आसेगाव पोलिस पाटील बाळू कांबळे यांनी घटनास्थळी पोहो चून पंचनामा केला. मोबाईल व आधार कार्ड वरून मृतदेह सागर परळकर यांचा असल्याची ओळख पटली.
दरम्यान, उड्डाणपुलावर ३० फूट अंतरावर दुभाजकाजवळ परळकर यांची दुचाकी (एमएच २० सीई १९५) उभी करून ठेवलेली होती. दुचाकीच्या समोरचा हेडलाईट तुटलेला आहे. तर दुचाकी जवळ (टीएस १५ यूई ६९३४) या गाडीची नंबर प्लेट आढळली. यावरून अपघात की घातपात असा संशय निर्माण झाला आहे. मृतदेह घाटीत पाठवण्यात आला. सागर यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते एमआयडीसी वाळूज येथील पुष्पक ऍग्रो कंपनीचे संचालक होते. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे.
कन्नड येथील मित्र संदीप गपक यांना दुपारी फोन करून गौताळा येथे जायचे असल्याचे सांगून लोकेशन पाठव, असे सांगितले. दुपारी तीनच्या सुमारास हातनूर टोलनाक्याजवळ भेटले. तेथून गौताळल्याला गेले. रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीने पुन्हा घराकडे निघाले. हातनूरपासून ते एकटेच निघाले होते.
रात्री साडेनऊच्या सुमारास संदीपने सागरला पोहोचले की नाही म्हणून एकदा फोनही केला, पण त्यांनी उचलला नाही. त्यानंतर संदीप यांनी पुन्हा त्यांच्या घरच्यांना संपर्क केला तेव्हा ते घरी आलेच नसल्याचे समोर आले. रात्रीपासून मित्र, नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. शहरातील सर्व हॉस्पिटल पिंजून काढले. अखेर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास सोलापूर-धुळे हायवे आसेगाव वंजारवाडी चौकातील उड्डाणपुलाच्या ५० फूट खोल खाली नाल्यात सागर यांचा मृतदेह आढळला. डोक्याला, हाताला, पायाला, गुडघ्याला जबर मार लागला आहे. मृतदेहच्या बाजूला रक्ताचा थारोळे होते.
उनणपुलाच्या दोन लेनच्यामध्ये पोकळी मोठी पोकळी आहे. त्याला सुमारे चार फूट उंचीचे कठडे आहे. त्या कठड्यातून खाली ५० फूट खोल नाल्यात सागर यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे ते खाली पडले की टाकले, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दुचाकी मात्र पुलावरच दूरवर उभी करून ठेवलेली होती.