चक्क खासगी व्यक्तींने घेतला दुय्यम निबंधकांच्या खुर्चीचा ताबा file photo
छत्रपती संभाजीनगर

चक्क खासगी व्यक्तींने घेतला दुय्यम निबंधकांच्या खुर्चीचा ताबा

अधिकारी वेळेवर येत नसल्याचे म्हणत थेट कामकाजाला केली सुरुवात, गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

A private individual took over the post of Deputy Registrar case filled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ मधील दुय्यम निबंधकांच्या खुर्चीचा ताबा घेत मंगळवारी (दि. २४) सकाळी चक्क एका खासगी व्यक्तीने रजिस्ट्री नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली.

आबूलाला हाश्मी असे या व्यक्तीचे नाव असून, अधिकारी वेळेवर येत नाहीत, त्यामुळे जनतेने मला नियुक्त केले आहे, असे म्हणत कामकाजही सुरू केले. या प्रकाराने हादरून गेलेल्या प्रशासनाने सायंकाळी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेनंतर कार्यालयाचे कामकाज बंद केल्याने रजिस्ट्रीसाठी आलेले नागरिक दिवसभर ताटकळून निघून गेले.

सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ येथील सह दुय्यम निबंधक आर. पी. आबूआला हाश्मी याने दुय्यम निबंधकांच्या खुर्चीचा ताबा घेतला. राठोड हे २३ फेब्रुवारीपासून आजारी रजेवर होते. मंगळवारी सकाळी १०:३० वाजेपर्यंत ते कार्यालयात हजर झाले नव्हते.

तब्बल दीड कोटींचा महसूल बुडाला

या अनपेक्षित आणि धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आणि तक्रार देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय अधिकारी-कर्मचारी सिटी चौक पोलिस ठाण्यात गेल्याने तिन्ही नोंदणी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना ताटकळून माघारी परतावे लागले. यामुळे दिवसभरातील सुमारे १ ते १.५ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नसल्याने नागरिक ताटकळत उभे होते. याचा फायदा घेत आबूलाला हाश्मी याने कार्यालयात हस्तक्षेप केला. अधिकारी दलालांचा मुक्तसंचार या घटनेनंतर सिटी चौक पोलिस ठाण्यात हाश्मी आणि त्याच्या १० ते १५ साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानिमित्ताने नोंदणी कार्यालयातील काही कर्मचारीच खासगी व्यक्तींना गोपनीय माहिती देऊन अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यास मदत करतात, अशी चर्चा सुरू होती. कार्यालय परिसरात दलालांचा मुक्तसंचार असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

वेळेवर येत नाहीत, आता मीच कारभार करणार, असे म्हणत तो चक्क मुख्य खुर्चीवर जाऊन बसला. समोर ठेवलेले शासकीय दस्तही हाताळले आणि सर्वांचे दस्त नोंदवले जातील, असे उपस्थितांना जाहीर केले. १५-२० मिनिटांच्या या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला.

हा व्हिडिओ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांची कानउघाडणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळेवर हजर न राहिलेले दुय्यम निबंधक राठोड यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. यासोबतच खुर्ची बळकावणाऱ्या हाश्मीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याचेही निर्देश दिले. यानंतर सह दुय्यम निबंधक रवींद्र युवराज तोंडे यांच्या फिर्यादीवरून आबूलाला हाश्मी यांच्यासह १० ते १५ जणांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT