Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Municipal Elections : युतीसाठी मंत्री बावनकुळे, शिरसाट, सावे यांच्यात मध्यरात्री बैठक

जागा वाटपावर ९९ टक्के एकमत : आज होणार अधिकृत घोषणा

पुढारी वृत्तसेवा

A meeting was held between ministers Bawankule, Shirsat, and Save at midnight regarding the alliance

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपावर गुरुवारनंतर शुक्रवारी (दि. २६) देखील मध्यरात्री उशिरापर्यंत भाजप कार्यालयात नेत्यांचा काथ्याकूट सुरूच होता. यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीचे पदाधिकारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत युतीच्या जागा वाटपावर ९९ टक्के एकमत झाले आहे. आता मंत्री शिरसाट यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शनिवारी युतीची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महापालिकेची निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी मागील दोन दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याची बैठक सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजेपर्यंत भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी युतीवर बैठक सुरू होती. त्यात जागा वाटपावर सुरू असलेली रस-सीखेच काही प्रमाणात कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जवळपास ८० टक्के जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून, काही जागांवर अजूनही मतभेत कायम होते. त्यामुळेच शुक्रवारी सकाळी पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बावनकुळे हे शहर दौर्यावर आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली चिकलठाण्यातील भाजप कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीत मराठवाड्यातील पाचही महापालिकांच्या निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाली. तर संभाजीनगर महापालिकेतील युतीवर सर्वात शेवटी रात्री आठ वाजता बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक चार तास चालू होती.

या बैठकीत मंत्री बावनकुळे यांच्यासह जिल्ह्याचे प्रभारी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, समीर राजूरकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, यासर्वांसोबत झालेल्या चर्चेनंतर मंत्री बावनकुळे हे पालकमंत्री शिरसाट यांच्या निवासस्थानाकडे मध्यरात्री १२.३० वाजता रवाना झाले. तेथे युतीची बैठक होणार असून, त्यात जागा आणि युती यावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिले.

नेत्यांची मुले, इन कमिंग वरून वाद

नेत्यांच्या मुलांसह पक्षात बाहेरून आलेल्या आयात इच्छुकांच्या उमेदवारांवर चर्चा झाली. युतीमुळे काही जागा शिंदेसेनेला द्याव्या लागणार असल्याने इच्छुकांना नकार कसा द्यावा आणि कोणाला माघार घेण्याची सूचना करावी, यावर खल झाला. अखेर बावनकुळे यांनी काहींना बोलावून माघार घेण्याचा सल्लाही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT