Godavari River : गोदावरीवर नवीन तंत्रज्ञानातून साकारतोय वैभवशाली पूल file photo
छत्रपती संभाजीनगर

Godavari River : गोदावरीवर नवीन तंत्रज्ञानातून साकारतोय वैभवशाली पूल

पर्यटन आणि वारकऱ्यांसाठी ठरणार वरदान, खा. भुमरे यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

A magnificent bridge is taking shape over the Godavari using new technology

दादासाहेब गलांडे

पैठण : गोदावरी नदीवर नाथ मंदिरापासून जुन्या कावसानपर्यंत मोठा पूल बनवण्यात यावा, अशी मागणी पैठणकरांसह वारकऱ्यांची अनेक वर्षांची होती. गोदावरी नदीवर भव्यदिव्य पूल उभारण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून खासदार संदीपान भुमरे यांचे होते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. गोदावरी नदीवरील हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नसून पैठणच्या वैभवात भर घालणारा विकासाचा नवा अध्याय असल्याचे आमदार विलास भुमरे म्हणाले.

नाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या पालखीओट्यापासून जुने कावसान येथील येथील जुन्या नगर रोडला या पुलाला जोडले जाणार आहे . नदीपात्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी रचना उभारली जात असून कोकण भवन मुख्य अभियंता यांनी तांत्रिक पाहणी केल्यानंतरच या पुलाची डिझाईन बनवण्यात आलेली असून पुलामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळणार आहे.

उद्योग धंदे वाढीस लागण्याची आशा आहे. हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर कावसान परिसरात सुरू होण्याची शक्यता आहे. नाथ षष्ठी, एकादशी व इतर उत्सव काळात लाखो भाविक वारकरी नाथांच्या दर्शनासाठी पैठण येथे येत असतात. गंगेचे पात्र षष्ठीच्या दरम्यान अपुरे पडत असल्यामुळे दिंड्यांना शहराच्या बाहेर थांबावे लागत होते. मात्र या पुलामुळे दिंड्या नाथ मंदिर परिसराच्या जवळ थांबू शकतील.

या नवीन पुलामुळे पैठणच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे. सदरील पुलाचे काम के.एच. कन्स्ट्रक्शन छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून सुरू असून या पुलाच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एन.जी. तनपुरे हे कामावर लक्ष ठेवून आहेत.

पैठणच्या वैभवात भर

गोदावरी नदीवर पूल उभारण्यासाठी खासदार संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूल बनवण्यात येत आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल उद्योगधंदे वाढतील. नाथषष्ठीच्या काळात वारकऱ्यांसाठी हा पूल वरदान ठरणार आहे.

सदरील पोल हा गोदावरी नदीची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. नदीच्या पात्रात २२ हजार क्युबिक पाणी सोडले तरीही पूल पाण्यात बुडणार नाही. त्यामुळे या पुलाची उंची गोदापात्रापासून ४५फूट उंच आहे. के एच कन्स्ट्रक्शन कंपनी काम करत असून पूल हा दर्जेदार होणार आहे.
राजेंद्र बोरकर (सहायक अभियंता श्रेणी १)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT