ZP Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांची वंचितकडे गर्दी File Photo
छत्रपती संभाजीनगर

ZP Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांची वंचितकडे गर्दी

वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक मेदवाराच्या रविवारी (दि.१८) मुलाखती घेण्यात आल्या.

पुढारी वृत्तसेवा

A large number of aspirants are flocking to the Vanchit Bahujan Aghadi for Zilla Parishad and Panchayat Samiti elections

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक मेदवाराच्या रविवारी (दि.१८) मुलाखती घेण्यात आल्या. याला इच्छुकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, कार्यालयावर दिवसभर गर्दी दिसून आली. या मुलाखती केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल्या.

नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आल्याने आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर इतर प्रभागांत वंचितला मतदारांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता इच्छुकांची गर्दी वाढली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांची शनिवार (दि.१७) पासून पक्ष कार्यालयात मुलाखती सुरू आहेत. शनिवारी पंचायत समितीसाठी ३५, तर जिल्हा परिषदेसाठी २२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

रविवारी सकाळपासूनच इच्छुकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेसाठी ८२ तर पंचायत समितिसाठी १७० इच्छुकांनी मुलाखतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. मुलाखतीसाठी जिल्हा निरीक्षक योगेश बन, जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, रूपचंद गाडेकर, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव अंजन साळवे, रामदास वाघमारे, जिल्हा संघटक रवी रत्नपारखे, भाऊराव गवई, प्रवीण जाधव, आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT