A gang of robbers has been roaming the area for four days, turning off the lights.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा हद्दीतील फत्तेपूर भागातील वसाहतींमध्ये दरोडेखोरांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि.२२) मध्यरात्री चार घरांचे कडी-कोंडे तोडून चोरीचा प्रयत्न झाला. पोलिसांची गस्त नसल्याने गेल्या चार दिवसांपासून दररोज पहाटे ३ वाजेनंतर टोळी याच भागात फिरत आहे. या प्रकारामुळे रहिवाश्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, लोकांनी स्वतःच रात्री गस्त घातली आहे.
अधिक माहितीनुसार, शहर व परिसरात उद्योग व्यवसायामुळे मोठ्याप्रमाणात वसाहती निर्माण झाल्या. शेंद्रा जवळील फत्तेपूर परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. नोकरदार वर्ग, कामगार बहुसंख्य आहे. गेल्या वर्षभरात या भागात १० ते १५ घटना घडल्या आहेत.
दिवसेंदिवस या भागात पोलिसांची गस्त नसल्याने चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून चोरट्यांनी फत्तेपूर भागाला टार्गेट केले आहे. पहाटे ३ वाजेनंतर डीपीवरून वीज पुरवठा बंद करून टोळी या भागा बॅटऱ्या लावून फिरते. कुलूप असलेली घरे फोडून ऐवज चोरीचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. चिकलठाणा पोलिसांकडून ठोस उपाययोजना, गस्त घातली जात नसल्याचा नागरिकांच आरोप आहे. चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद झालेल आहेत.
दरम्यान, गुरुवारी पहाटे पुन्हा चोरांची टोळी या भागात आल्याने ५० ते ६० रहिवासी रस्त्यावर उतरले होते. पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास डायल ११२ ला संपर्क करून माहिती देण्यात आली, मात्र पोलिसांची गाडी सकाळी सात वाजता आल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांना गांर्भीय नाही का, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.