Sambhajinagar News : मुलांच्या भांडणातून राडा ! घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोन स्कुटी पेटवल्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मुलांच्या भांडणातून राडा ! घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोन स्कुटी पेटवल्या

मुलांच्या भांडणातून सुरू झालेला वादानंतर आरोपींनी घरात घुसून सुनेला माचीसची काडी दाखवत धमकावले.

पुढारी वृत्तसेवा

A fight between children! After entering the house, molested the woman, set two scooters on fire

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलांच्या भांडणातून सुरू झालेला वादानंतर आरोपींनी घरात घुसून सुनेला माचीसची काडी दाखवत धमकावले. तिचा हात धरून ओढत विनयभंगाचा प्रयत्न केला. तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या दोन स्कुटी पेटवून दिल्या. जयभवानी चौक-नारेगाव चौफुली परिसरातील या घटनेनंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकालाही मारहाण करण्यात आली.

ही घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३३ वाजेच्या सुमारास घडली. यात राजरत्न संदीप नरवडे (२२), अनुज बाबासाहेब नरवडे (२३, दोघे रा. ब्रीजवाडी) आणि त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात ५० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, नारेगाव चौफुली येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादीच्या मुलाला आरोपी अनुज नरवडे हा मारहाण करीत होता. मुलाचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी तेथे गेले. काही वेळाने त्यांच्या मुलीचा फोन आला. राजरत्न संदीप नरवडे आणि त्यांचे दोन साथीदार मारहाण करीत असल्याचे तिने सांगितले. तसेच अनुज नरवडे घराबाहेर उभी असलेली स्कुटी जाळत असल्याचेही कळविले. घटनेवेळी फिर्यादीची सून आणि मुलगी घरात होत्या.

अनुज नरवडे याने घरात घुसून सुनेला माचीसची काडी दाखवत धमकी दिली. तसेच वाईट हेतूने तिचा हात धरून ओढल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ किंवा बाटली टाकण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार पाहून फिर्यादीच्या मुलीने सुनेची आरोपीच्या तावडीतून सुटका करून घराचा गेट बंद केला.

यानंतर आरोपींनी घराबाहेर उभ्या असलेल्या फिर्यादीच्या दुचाकीला (एमएच २०-५३७६) आणि मुलाचा मित्र आकर्षक सातपुते याच्या इलेक्ट्रिक स्कुटीच्या सीट पेटवून दिली. आगीत दोन्ही वाहनांच्या सीटचे अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आग विझवली.

दरम्यान, फिर्यादी ब्रिजवाडी रिक्षा स्टँडजवळून भावाच्या घरातून दुचाकी आणण्यासाठी जात असताना राजरत्न नरवडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना अडवले. शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार जहिर शेख हे पुढील तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT