70 percent water storage in Shivna Takli project
हतनूर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असलेला शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात ७० टक्के जलसाठा झाल्याने मंगळवारी संत-महंत यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
तालुक्यात २६ जुलै रोजी जोरदार पाउस झाल्याने प्रकल्पाच्या वरील बाजूस असलेल्या शिवना व गांधारी नदी सह नाल्याना मोठा पूर आल्याने जुलै महिन्याच्या शेवटी जलसाठा सत्तर टक्के पर्यंत पोहचला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झालेमहंत ज्ञानदास माऊली महाराज, महंत स्वामी रामेश्वरनंद सरस्वती महाराज, स्वामी शिवानंद गिरी महाराज. यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी उबाठा तालुकाप्रमुख संजय मोठे, कृउबा माजी सभापती प्रकाश घुले, हतनूर माजी सरपंच साहेबराव अकोलकर सुदाम बोडके, आबासाहेब आहेर, प्रकाश आबा आहेर, भाजपचे मंडळ अध्यक्ष ललित सुरासे दीपक बोडके चांगदेव सावडे, मालुसकर काका, नितीन बारगळ, सुनील भाऊ बोडखे, विजय हारदे, बबन डगळे, दीपक बोडखे, अविनाश डगळे, नारायण हारदे, नवनाथ डगळे, भारत हार्दे, दत्तू पा आहेर रवी मोहिते, निलेश मोहिते विष्णू झाल्टे भारत डगळे, भगवान बारगळ रमेश देशमुख संतोष गायकवाड, आदीनाथ बोडखे, शाहीस्तीखं पठाण, आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.