Marathwada Farmers : मराठवाड्यात आठ महिन्यांत ६५३ शेतकर्‍यांनी जीवन संपवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Farmers : मराठवाड्यात आठ महिन्यांत ६५३ शेतकर्‍यांनी जीवन संपवले

बीडमध्ये सर्वाधिक १४९ जीवन संपवल्याच्या घटना, मदतीस ३६३ कुटुंब पात्र, २३२ अपात्र

पुढारी वृत्तसेवा

653 farmers ended their lives in Marathwada in eight months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांतच तब्बल ६५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवली आहे. यात सर्वाधिक १४९ आत्महत्या एकट्या बीडमध्ये घडल्या आहेत. असे असले तरी आतापर्यंत विभागात केवळ ३६३ मृतांच्या कुटुंबांनाच मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. तर ५८ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.

राज्यातील दुष्काळी भाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. मागील सहा वर्षांपासून विभागातील पर्जन्यमानाचे प्रमाण वाढले असून दमदार पाऊस होत आहे. शासनाने सध्या कर्जमाफीचाही निर्णय घेतला आहे. मात्र, असे असतानाही विभागातील शेतकरी आत्महत्या थांबण्यास मराठवाड्यात गेल्या ८ महिन्यांमध्ये तब्बल ६५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

त्यात बीडमध्ये सर्वाधिक १४९, तर दुसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर असून जिल्ह्यात १३८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. यात आतापर्यंत ३६३ मृत शेतकऱ्यांचे वारस मदतीस पात्र ठरले आहेत. तर २३२ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असून ५८ आत्महत्या अपात्र ठरवल्या आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारी :

छत्रपती संभाजीनगर : १३८, जालना : ६१, बीड : १४९, नांदेड : ८२, परभणी : ४५, धाराशिव : ८८, लातूर : ४६, हिंगोली : ४५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT