Marathwada Rain : मराठवाड्यात ५० दिवसांपासून पावसाचा खंड

मराठवाड्यात तब्बल ५० दिवसांपासून पावसाने दडी मारली असून ७५ पैकी सुमारे ३८ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली आहे.
Marathwada Latest News
मराठवाड्यात ५० दिवसांपासून पावसाचा खंडfile photo
Published on
Updated on

Dry spell in Marathwada for 50 days

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात तब्बल ५० दिवसांपासून पावसाने दडी मारली असून ७५ पैकी सुमारे ३८ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांत खरीप पिकांची दयनिय आवस्था झाली आहे.

Marathwada Latest News
Vehicle Theft Gang : वाहन चोरी टोळीतील दोघांकडून १२ दुचाकी जप्त

हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीवरील मका, सोयाबीन पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यासोबतच आता पिण्याच्या पाण्याची देखील बिकट स्थिती निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरची मागणी वाढल्याने दुष्काळाची दाहकता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

गावा, प्रत्येक जिल्ह्यातील वाड्यांमधून आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. त्यात हलक्या जमिनीवरील कापूस, सोयाबीन आणि मका हे पीक पूर्णतः हातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय, मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील पीकही आता हातून जाण्याच्या स्थितीत आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनंतर आता महसूल व कृषी विभागांने खरीप पिकांचे पंचनामे करण्यापूर्वीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पावसाचे खंड आणि जून, जूलैमध्ये बरसलेला पाऊस आणि ऑगस्ट-सप्टेंबरचा पाऊस यासर्वांची माहिती शासन नियमावलीनुसार संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Marathwada Latest News
Twelve Jyotirlingas : बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

पहिल्या दोन महिन्यांतील पावसाच्या निकषात मराठवाड्यातील केवळ ९ तालुकेच दुष्काळी स्थितीत पात्र ठरत आहेत. परंतु, सप्टेंबरपर्यंत ५० ते ७५ टक्क्यांच्या आत पाऊस असलेल्या तालुक्यांची संख्या ही ३८ एवढी आहे. नांदेड, हिंगोली, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात पावसाची स्थिती बरी आहे. मात्र उर्वरित धाराशिव, परभणी, बीड आणि लातूरमध्ये अतिशय बिकट स्थिती असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये २ तालुके, जालन्यात ३ तर बीडमध्ये ८, लातूरमध्ये ५, धाराशिवमध्ये ६, नांदेडमध्ये ४ आणि परभणी ७ आणि हिंगोलीमध्ये ३ असे ३८ तालुक्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत ७५ टक्क्यांच्या आतच पाउस झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news