6 people died, 213 animals were killed in three days
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे मराठवाड्यात तीन दिवसांत सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, २१३ जनावरे दगावली आहेत. यासोबतच कच्च्या पक्या स्वरूपाच्या तब्बल ८९२ घरांची पडझड झाली आहे. चार ठिकाणी पूल वाहून गेले. तसेच ८ शाळांना पावसाचा फटका बसला आहे.
धाराशिव जिल्ह्यात ४ आणि नांदेड व बीड जिल्ह्यात प्रत्येकी १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे मराठवाड्यात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक ८१ जनावरे एकट्या धाराशिव जिल्ह्यात दगावली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४०, नांदेड जिल्ह्यात २७, जालना जिल्ह्यात २६, बीड व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यात ६११ घरांची पडझड झाली आहे. लातूर जिल्ह्यात ८९, नांदेड जिल्ह्यात ५६, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७३, परभणी जिल्ह्यात ४२ घरांची पडझड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सहा शाळांचेही नुकसान झाले आहे.