

Godavari River overflows; water enters Paithan
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : जायकवाडी धरणातून रविवारी (दि. २८) गोदापात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे पैठण शहराच्या काही भागांपर्यंत रात्री पाणी पोहोचले. वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी येत असल्याने या धरणाचे सर्वच्या सर्व २७ दरवाजे आठ फुटांनी उघडण्यात आले आहेत, पात्रात ३ लाख ६ हजार ५४० क्युसेकडून अधिक पाण्याचा विसर्ग असून, आतापर्यंत तीस हजार नागरिकांना सुरक्षित पुरामुळे पैठण अहिल्यानगर रस्ता बंद करण्यात आला असून, कहारवाडा, संतनगर, यात्रा मैदान, गागाभट्ट चौक, डोलेश्वर मंदिर, नाथ मंदिर समाधी परिसर, जांभळी बाग, छत्रपती शिराजी महाराज पुतळा परिसर, डॉ. आंबेडकर पुतळा परिसर, चसस्थानक, बाजारपेठ, सराफर दुकाने व नाथ मंदिर पायऱ्यांपर्यंत पाणी आले आहे. सखल भागांत पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
२००६ नंतर पहिल्यांदा गोदावरी नदीतून २ लाख ९० हजार क्यूसेकडून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नागरिकांत घबराटीचे बातावरण निर्माण झाले आहे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, धरण उपअभियंता मंगेश शेलार, आमदार विलासबापू भुमरे, नाथ मंदिर कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, पोलिस उप अधीक्षक सुनील पाटील, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, नगरपरिषद मुख्याधिकारी मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, रोटरी प्रमुख पवन लोहिया, व्यापारी महासंघाचे ता. ज्ञानेश्वर उगले, रामेश्वर सुसे, शहराध्यक्ष स्वदेश पांडे, उमेश तदू तुषार पाटील, शिवराज पारिक, प्रशांत जगदाळे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांती धरण परिसराची पाहणी करून स्थानिक प्रशासनाला पाण्याच्या विसर्गासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
कातपूर, आपेगाब, पिंपळवाडी, कुरणपिंपरी, नवगाव, हिरडपूर, आवडे उंचेगाव, तुळजापूर, वडवळी, नायगाव, मायगाव या भागांतील शेतीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. शेतवस्तीवर राहणाऱ्यांना विहामांडवा येथील शाळांमध्ये निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आमदार संजय केणेकर, आमदार बिलासबापू भुमरे, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांनी नाथ हायस्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना रात्रीचे जेवण उपलब्ध करून दिले, नाथसागर धरणात वरील भागांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्यामुळे रात्री उशिरा पाणी आणखी सोडले तर पैठण शहरातिल परिस्थिती २००६ पेक्षाही भयानक होईल, अशी शक्यता आहे.