Marathwada Rains break records : मराठवाड्यात पावसाने तोडले सर्व रेकॉर्ड

यंदा सरासरीच्या १४१ टक्के पाऊस, दुष्काळी प्रदेशाची कोकणच्या दिशेने वाटचाल
Marathwada Rain
Rains break records : मराठवाड्यात पावसाने तोडले सर्व रेकॉर्डFile Photo
Published on
Updated on

Rains break all records in Marathwada

सुनील कच्छवे

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळी प्रदेश अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आतापर्यंत मराठवाड्यात वार्षिक सरा-सरीच्या तब्बल १४१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्याची वाटचाल कोकणच्या दिशेने होत असल्याचे बोलले जात आहे. यंदा इथे पाऊस मिमीऐवजी सेंटीमीटरमध्ये मोजण्याची वेळ आली आहे. यंदा हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक १११८ मिमी पाऊस झाला आहे.

Marathwada Rain
Manoj Jarange Patil Statement | "नुकसान भरपाईसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका!" : मनोज जरांगे पाटील

मराठवाडा हा कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाचे वर्ष याला अपवाद ठरले आहे. पावसाने मराठवाड्यावर यंदा अगदी उन्हाळ्यापासूनच म्हणजे मे महिन्यापासून अवकृपा केली आहे. मे महिन्यातच विभागात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आता सप्टेंबर महिन्यात तर पावसाने सर्व रेकॉर्ड तोडले. मराठवाड्यात वर्षाकाठी सरासरी ६६९ मिमी पाऊस होतो. बहुतेक वर्षी हा पाऊस सरासरीहून कमीच असतो.

मात्र, यंदा आतापर्यंत या वार्षिक सरासरीच्या १४० टक्के म्हणजे तब्बल १४१ टक्के पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक १११८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. फक्त सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात सरा-सरी १५४ मिमी पाऊस अपेक्षित आहे. मात्र, यंदा सप्टेंबर महिन्यात ३६० मिमी पाऊस झाला. हे प्रमाण या महिन्याच्या सरासरीच्या तब्बल २३३ टक्के इतके आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात यंदा सर्वत्र पूरस्थिती निर्माण होऊन सोयाबीन, मका, कपाशी, तूर, मूग यासारखी खरीपाची हाताशी आलेली पिके नष्ट झाली आहेत.

Marathwada Rain
Flood News | गोदावरी खवळली; मराठवाड्यात पूरस्थिती कायम
भारतीय उपखंडात हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात तापमान चांगले असल्यामुळे तिथे सातत्याने कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. त्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे. हा प्रकार एप्रिल महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे यंदा मे महिन्यात आपल्याकडे अभूतपूर्व पाऊस झाला. अल निनो इफेक्ट अजून कायम आहे. आपल्याकडे यंदा १४ सप्टेंबरपासून मान्सून माघारीला वळला. तो उशीराने वळणे अपेक्षित होते. तो लवकर वळला नसता तर जो पाऊस लातूर, धाराशिवला पाऊस पडला, त्या पावसाचे विकेंद्रीकरण होऊन राज्यातील इतर जिल्ह्यात आणि मध्यप्रदेश, राजस्थानात पडला असता.
उदय देवळणकर, हवामान अभ्यासक

सेंटीमीटरमध्ये पाऊस मोजण्याची वेळ

महाराष्ट्रातील कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. तेथील वार्षिक पर्जन्यमान हे २ हजार ते ३ हजार मिमी इतके असते. त्यामुळे कोकणात पाऊस मिमीऐवजी सेंमीमिटरमध्ये मोजतात. यंदा मराठवाड्यातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

गतवर्षी १२० टक्के पाऊस

मराठवाड्यात गतवर्षीही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. महसूल विभागाकडील नोंदीनुसार गतवर्षी विभागात सरासरी ८२० मिमी पाऊस झाला होता. त्याचे प्रमाण सरासरीच्या १२० टक्के इतके होते. त्याआधीच्या कित्येक वर्षांत मराठवाड्यात सरासरी-पेक्षा कमीच पाऊस होत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news