₹57 lakh compensation for heirs of ST bus conductor killed in accident
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील एसटी बस वाहक चंद्रशेखर मधुकर पाटील यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व बसचालक यांनी संयुक्तपणे ५७ लाख १६ हजार ९०० रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून मंजूर रकमेवर ६ टक्के दराने व्याज द्यावे, असा आदेश मोटार अपघात न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी दिला.
चंद्रशेखर पाटील हे २००८ पासून एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात वाहक म्हणून कार्यरत होते. ९ जानेवारी २०२२ रोजी ते एमएच-२०-बीएल-३०१७ या बसवर कर्तव्य बजावत होते. सुभाष भगवान गायकवाड हे बस चालवत होते. लातूर-अंबाजोगाई मार्गावरील राष्ट्रीय सायगाव शिवारात बस व ट्रकचा अपघात झाला.
या दुर्घटनेत चंद्रशेखर पाटील यांचा मृत्यू बर्दापूर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर मयताची पत्नी, दोन अल्पवयीन मुले व आई-वडील यांनी अॅड. पी. एस. तांदुळजे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात ७५ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला.
जय महाराष्ट झाला. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सुनावणीदरम्यान, बस चालकाने अपघातास आपण जबाबदार नसल्याचा बचाव केला. मयताच्या पत्नी दीपाली चंद्रशेखर पाटील तसेच परिवहन महामंडळाचे कर्मचारी व लेखाकार अक्षय अशोकराव कळम यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मयताचे उत्पन्न, वय, भविष्यकालीन नुकसान व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा विचार करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. पाटील कुटुंबीयांतर्फे अॅड. पी. एस. तांदुळजे, अॅड-सुनीता पी. तांदुळजे व अॅड. आर. टी. बावस्कर यांनी काम पाहिले.
न्यायालयाचा आदेश
नुकसानभरपाई : ५७ लाख १६ हजार ९०० रुपये
व्याजदर : ६ टक्के प्रतिवर्ष
लाभार्थी : पत्नी, दोन अल्पवयीन मुले व आई-वडील
जबाबदारी : एसटी महामंडळ व बसचालक यांची संयुक्त