Sambhajinagar News : बाबा फर्जनच्या बंगल्यातील ५.२६ कोटी बँकेत जमा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : बाबा फर्जनच्या बंगल्यातील ५.२६ कोटी बँकेत जमा

५ कोटी २६ लाख रुपयांची रोकड अखेर बुधवारी (दि. १५) न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

₹5.26 crore from Baba Farjan's bungalow deposited in the bank

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मिटमिटा परिसरातील बाबा फर्जनच्या आलिशान बंगल्यातून गुन्हे शाखेने जप्त केलेली ५ कोटी २६ लाख रुपयांची रोकड अखेर बुधवारी (दि. १५) न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा करण्यात आली.

अनेक दिवस छावणी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलेली ही रोकड सुरक्षितस्थळी हलविल्याने पोलिसांवरील सुरक्षेचा ताण कमी झाला आहे. सुरुवातीला ही रक्कम कोषागारात ठेवण्याचा विचार झाला होता. मात्र, न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव व पथकाने चार कोठ्यांमध्ये भरलेली रोकड बँकेत जमा केली.

दुपारपासून बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून नोटांची मोजदाद सुरू असून, सायंकाळपर्यंत एका कोठीतील रक्कम मोजून पूर्ण झाली होती. यापूर्वी ही रोकड जप्त करताना पाच नोटा मोजण्याच्या मशिन्सच्या सहाय्याने तब्बल १६ तास मोजणी केली होती. प्रवेशद्वाराला हातकडी लावून सुरक्षारोकड व मोठा शस्त्रसाठा छावणी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला हातकडी लावून कुलूप बंद करण्यात आले होते.

'त्या' ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रहस्य कायम

५० सीसीटीव्हींच्या फुटेजची तपासणीबाबा फर्जनच्या बंगल्यातील सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात येणार आहे. या तपासातून बंगल्यातील हालचाली आणि फर्जनच्या संपर्कातील व्यक्तींविषयी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT