EVM News : मनपासाठी संभाजीनगरात लागणार ४६०० ईव्हीएम Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

EVM News : मनपासाठी संभाजीनगरात लागणार ४६०० ईव्हीएम

महापालिकेच्या २९ प्रभागातील ११५ वॉर्डाच्या निवडणुकीसाठी १२६४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

4600 EVMs will be required for the municipal elections in Sambhaji Nagar.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिकेच्या २९ प्रभागातील ११५ वॉर्डाच्या निवडणुकीसाठी १२६४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. ज्या प्रभागात ३० च्या आत उमेदवार आहेत. तेथे ३ तर ज्या प्रभागात ४० हून अधिक उमेदवार आहेत, तेथे ४ मतदान यंत्र लागणार असल्याने सर्वच मतदान केंद्रांसाठी सुमारे ४ हजार ६०० बॅलेट युनिट लागणार आहेत. तर १५०६ कंट्रोल युनिट लागतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यासह माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सर्वच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे.

शहरातील २९ प्रभागांतील ११५ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून त्यासाठी ८५९ उमेदवार नशिब अजमावित आहेत. यंदा महापालिकेची निवडणूक प्रभागनिहाय होत आहे. यात एका प्रभागात सुमारे २८ हजार ते ४५ हजार मतदार आहे.

त्यानुसार मतदान केंद्र तयार करण्यात आले असून ९०० मतदारांचा एक मतदान केंद्र याप्रमाणे ११ लाख १८ हजार २८३ मतदारांसाठी १२६४ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. यात काही प्रभागात ३० च्या आत उमेदवार असल्याने ३ काही ठिकाणी ४० हून अधिक उमेदवार असल्याने तेथे ४ बॅलेट युनिट आणि १ कंट्रोल युनिट तर चारहून अधिक बॅलेट युनिट झाल्यास तेथे दोन कंट्रोल युनिट लागते, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूक कार्यालयनिहाय यंत्र

निवडणूक कार्यालय - १ मध्ये २३५ कंट्रोल युनिट तर ७६४ बॅलेट युनिट लागणार आहे. तर मतदान कार्यालय २ मध्ये १४१ कंट्रोल युनिट, ३९३ बॅलेट युनिट, निवडणूक कार्यालय ३ मध्ये १९३ कंट्रोल युनिट, ५३३ बॅलेट युनिट, निवडणूक कार्यालय ४ मध्ये १५२ कंट्रोल युनिट, ५५८ बॅलेट युनिट, निवडणूक कार्यालय ६ मध्ये १२७ कंट्रोल युनिट, ४५१ बॅलेट युनिट, निवडणूक कार्यालय ७ मध्ये १५८ कंट्रोल युनिट, ४२५ बॅलेट युनिट, निवडणूक कार्यालय ८ मध्ये १८० कंट्रोल युनिट, ६५० बॅलेट युनिट आणि निवडणूक कार्यालय ९ मध्ये १५० कंट्रोल युनिट, ३५० बॅलेट युनिट लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT