

A speeding car collided with an auto-rickshaw; the driver and an elderly woman were killed.
करमाड, पुढारी वृत्तसेवा :
जालन्याकडून छत्रपती संभाजीनगरकडं जाणारी रिक्षा आणि पाठीमागून येणारी भरधाव कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकासह एका वृद्ध महिला जागीच ठार झाली, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. ३) सकाळी साडेनऊच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरड्डुजालना महामार्गावर एमआयडीसी लिभेर चौकाजवळ घडला.
या अपघातात रिक्षाचालक चिंतामणी जोतीराम वाहुळे (वय ३६, रा. कैकाडी मोहल्ला, जालना) आणि रिक्षातील प्रवासी वृद्ध महिला इंदराबाई भावराव कोल्हे (वय ८२, रा. कडेगाव, ता. बदनापूर, जि. जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार बाळू बागल (वय १८, रा. लाडगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कार (क्र. एम एच ४८ एडब्ल्यू ०५६४) ही भरधाव वेगात छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. त्याचवेळी जालन्याकडून प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा (क्र. एम एच २१ बीजी ०९८१) पुढे चालली होती. लिभेर चौकाजवळ कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली धडकेत्ता जोर एवढा होता की रिक्षा उंच उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली आणि नाल्यात जाऊन को-सळली.
अपघातानंतर घटनास्थळी रक्त आणि मांसांचा सडा पडलेला दिसत होता. रिक्षातील प्रवाशांच्या रक्ताने कारचा दरवाजाही पूर्णपणे माखलेला होता. जोरदार आवाज झाल्याने प्रतिबध्यांची मोठी गर्दी जमली स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केलं. अपघात होताच कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. कारमधील प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र, अपघातावेळी कारमधील एअरबॅग उघडल्यामुळं कारमधील प्रवासी बचावले असल्याचे समजते.
अपघातात्ती माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार सतीश देवकर आणि सुनील सुरशे प्रढील तपास करत आहेत.
अपघातामुळे वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. भरधाव वाहनांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून, वेगमर्यादा कडकपणे राबवाव्यात, वाहतूक नियंत्रण अधिक कडक करावे तसेच जालना मार्ग सहापदरी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.