44 lakhs scammed by promising high profits
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सायबर भामट्यांनी तब्बल ४४ लाख २३ हजाराला गंडा घातल्याचे नुकतीच उघडकीस आले. ही घटना ३ मे ते १२ जुलै २०२४ दरम्यान घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एका सिड्स कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी अरविंद विजयकुमार द्विवेदी (५६, रा. उत्तरानगरी, चिकलठाणा) ३ मे २०२४ रोजी मोबाइलवर शेअर मार्केट शिका अशी एक लिंक दिसली. ही लिंक क्लिक करताच त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. या ग्रुपमधील विक्रम ठाकूर याने द्विवेदी यांच्याशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगितले.
गुंतवलेल्या रकमेवर नफ्याची रक्कम २ कोटी ५५ लाख ९२ हजार रुपये इतकी दाखवण्यात आली. ८ जुलै २०२४ रोजी द्विवेदी यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. अॅपवर ट्रान्झेंक्शन सक्सेस असे दाखवले. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यात एकही रुपये आला नाही.
शंका उपस्थित केल्यावर १२ जुलै २०२४ रोजी हे अॅप बंद झाले. फसवणूक झाल्याचे समजताच द्विवेदी यांनी राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टगिं पोर्टल तक्रार नोंदवली. त्यानंतर या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाकूर याने द्विवेदी यांना प्रथम कॅपल मार्केट नावाचे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर द्विवेदी यांनी ठाकूर याच्या सांगण्यावरून २२ मे २०२४ रोजी कॅपुला इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट नावाच्या खात्यावर २० हजार वळते केले. दुसऱ्या दिवशी २ हजार ५०० रुपयांचा नफा दाखवण्यात आला. यामुळे द्विवेदी यांचा विश्वास बसला. त्यानंतर द्विवेदी यांनी २४ मे ते ८ जुलै २०२४ या कालावधीत आयएमपीएस व आरटीजीएस च्या माध्यमातून १५ पेक्षा अधिक बँक खात्यांवर तब्बल ४४ लाख २३ हजार रुपये वळते केले.