Paithan Accident : मिनी बस व दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार, चालक फरार

पैठण येथे अपघातांची मालिका सुरूच
Paithan Accident
Paithan Accident : मिनी बस व दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार, चालक फरार File Photo
Published on
Updated on

Youth killed on the spot in mini bus and bike accident, driver absconding

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथे दररोज घडणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी रोजी रात्री झालेल्या अपघातात दोन जणांना आपला प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच शनिवारी दि.४ रोजी सायंकाळी पैठण ते शहागड रोडवरील शासकीय आयटीआय समोर चितेगाव येथील एका कंपनीच्या मिनी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. शत्रुघ्न लक्ष्मण बलैया वय ४० वर्षे रा. नवगाव, ता. पैठण असे मृत तरुणाचे नाव आहे.

Paithan Accident
Manoj Jarange : राहुल गांधींचा सल्ला घेत काँग्रेस मराठा आरक्षणाला विरोध करतेय

याबाबत अधिक माहिती अशी की पैठण शहर परिसरात शुक्रवारी रात्री कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात होऊन यामध्ये दोन जणांना आपला प्राण गमावावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. शनिवारी रोजी सायंकाळी चितेगाव परिसरातील एका कंपनीच्या कामगाराची प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनी बस क्र. एम एच २० सीटी ९७१४ ने शहागड रोडवरील शासकीय आयटीआय समोर दुचाकी क्र. एम एच २९ सी जे १३९६ वरून नवगावकडून येणाऱ्या तरुणाला समोरसमोर जोरदार धडक दिली.

या अपघातात मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या शत्रुघ्न लक्ष्मण बलैया या तरुणाच्या डोक्याचा अक्षरशः चंदामेंदा होऊन जागेवरच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर, पोहेकॉ अनिल गायकवाड यांनी अपघातची पाहणी करून पंचनामा केला आहे. अपघाताची घटना घडताच मिनी बसचालक फरार झाल्यामुळे पैठण पोलिस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Paithan Accident
Sanjay Shirsat : भावाला वशिल्याने नोकरीला लावले, पण तो सहा महिन्यांतच मला विसरला...

नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक

दरम्यान पैठण तालुक्यातील चितेगाव, बिडकीन, वाळूज, शेंद्रा, पैठण एमआयडीसी या परिसरातील वेगवेगळ्या कंपनीत दररोज मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष कामगार असून. या कामगारांना जाण्यायेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून प्रवासी करण्यासाठी बस वाहन व्यवस्था ठेकेदा राकडून करून घेतल्या जाते. परंतु प्रवासी वाहतूक करणारे सर्व नियम धाब्यावर बसवून दररोज पैठण शहरातून रहदारीच्या ठिकाणावरून वाहतूक पोलिस व राज्य प्रादेशिक परवान विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news