30-Year-Old Dies While Working Out 
छत्रपती संभाजीनगर

30-Year-Old Dies While Working Out |जिममध्ये व्यायाम करताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

30-Year-Old Dies While Working Out |जिममध्ये व्यायाम करताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली. अंकुश कडूबा रावते (वय ३०, रा. बहिरगाव) हे नेहमीप्रमाणे कन्नड शहरातील जिममध्ये व्यायामासाठी गेले होते.

व्यायाम करत असताना त्यांना अचानक अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर चक्कर येऊन ते खाली पडले. जिममधील साथीदारांनी तातडीने त्यांना बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. राजपूत यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

अंकुश रावते यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय ? व्यायाम करताना अचानक आलेल्या अशक्तपणा व चक्करमागे नेमके काय कारण होते ? याबाबत शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अंकुश रावते हे रोपवाटिका व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

कन्नड शहरातील व्यायमासाठी असलेल्या अनेक जिमचालकांकडे नगर परिषदेची कोणतेही परवानगी नाही. जिममध्ये अचानक उद्भवभवणाऱ्या प्रसंगासाठीची कोणतेही सुविधा उपलब्ध नाही. तसेच जिमचालक व्यायामसाठी येणाऱ्या तरुणाचे फिटणीस सर्टिफिकेट तज्ञ डॉक्टरकडून घेत नसल्याने असे प्रकार घडत आहे.

- डॉ. सदाशिव पाटील, माजी उपनगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT