228 people donate blood at the same time despite blood shortage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता आणि सुट्यांमुळे दोन महिन्यांपासून रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. अशा टंचाईच्या परिस्थिती घाटीतील विभागीय रक्तपेढीसाठी एकाच दिवसांत तब्बल २२८ रक्त पिशव्याचे संकलन झाले. वाळूज येथील एका कंपनीत झालेल्या रक्तदान शिबिरात दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
बिल्डिंग हेल्थिअर कम्युनिटी या सामाजिक उपक्रमांतर्गत वाळूज येथील मायलान कंपनीच्या वतीने शुक्रवारी रक्तदान शिविराचे आयोजन करण्यात आले. यावेळी घाटीचे उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत सामाजिकदायित्वातून नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. रक्तदान हेच दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी घाटीचे उपाधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे.
श्रेष्ठदान असून संकटाच्या काळात रुग्णांसाठी जीवनदान ठरते असेही सांगितले. रक्त संकलन केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजली बोर्डे, डॉ. अश्विनी तांगडे तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. या उपक्रमातून २२८ रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने घाटी रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रक्तदानासाठी कर्मचाऱ्यांचा पुढाकार
कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनीही अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.