Crime News  pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : सिडको ठाण्याच्या 100 फुटांवर तरुणाची हत्या, तब्बल 7 तासांनंतर पोहोचले पोलिस

मुख्य आरोपी नेवासा येथून ताब्यात, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० फुटावर रामलीला मैदानजवळ चौघांनी एका तरुणाची चाकूने भोसकून निघृण हत्या केली. ही थरारक घटना (शनिवारी दि.३०) मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास घडली. प्रवीण सुरेश मांडोळे (१८, रा. सिडको एन ६, संभाजी कॉलनी) असे मृताचे नाव आहे.

विशेष म्हणजे, ठाण्याच्या जवळ एवढी मोठी घटना घडूनही सिडको पोलिसांना तब्बल सात तासांनंतर याची माहिती मिळाली. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि गस्तीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्य आरोपी प्रसंजीत उर्फ चिक्या प्रमोद हिवाळे (२० रा. मुकुंदवाडी) आणि आरोपी अरुण पदमसिंह भूल (१९ रा. ब्रिजवाडी) दोघांना नेवासा येथून अटक करण्यात आली.

फिर्यादी रेणुका सुरेश मांडोळे (४२, रा. संभाजी कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, प्रवीण काही न सांगता घरातून १० वाजता निघून गेला. त्याला आईने १०:३० वाजेच्या सुमारास फोन करून पाहुण्यासाठी कपडे घ्य्याला जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने बजरंग चौकात असून कपडे उद्या असे सांगून फोन ठेवला. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास काळू उर्फ शुभम हा प्रवीणच्या घरी गेला. त्याने प्रवीणचा अपघात झाल्याचे सांगून रेणुका यांना एमजीएम हॉस्पिटल येथे घेऊन गेला. तिथे रक्ताने पूर्णपणे माखलेल्या प्रवीणवर उपचार सुरु होते.

रेणुका यांनी काळूला काय झाले अशी विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की, प्रवीण आणि काळू दोघांना त्यांचा मित्र प्रसंजित हिवाळे याने रात्री १:३० वाजेच्या सुमारास फोन करून रामलीला मैदानाशेजारी बोलावले होते. दोघेही तिथे गेल्यानंतर प्रशंजित आणि त्याचे दोन ते तीन साथीदार तिथे आलेले होते. त्यांनी प्रवीणला मारहाण सुरु केली. चाकूने कमरेत भोसकून, सपासप वार करून आरोपी तेथून पळून गेले.

प्रवीण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला दुचाकीवर बसवून काळू आणि त्याचे मित्र एमजीएममध्ये घेऊन गेले. सकाळी ५:३० वाजता डॉक्टरांनी त्याला निरीक्षक अतुल येरमे यांनी धाव घेतली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम, सिडकोचे अनिल नाणेकर, निवृत्ती गायके यांचे पथक मुख्य आरोपीचा कसून शोध घेत होते. नाणेकर यांच्या पथकाने रात्री अहिल्यानगर) भागातून मुसक्या आवळल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रसंजीत हिवाळे हा गुंड प्रवृत्तीचा असून कुख्यात गुंड दिवेकरसोबत त्याची सतत उठबस असायची.

सकाळी पोलिस घटनास्थळी

सिडको पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तरुणाची निघृण हत्या झाली. आरडाओरड, राडा झाला. मात्र, पोलिसांना याची कानोकानी खबर झाली नाही. रात्री १:३० वाजता घडलेल्या घटनेची सकाळी एमएलसी प्राप्त झाल्यानंतर सिडको पोलिस जागे झाले. त्यानंतर बाजूलाच असलेल्या घटनास्थळी धावले. दरम्यान, हत्येनंतर आरोपी रातोरात फरार झाले होते.

हत्येला मैत्रिणीच्या वादाची किनार

आरोपी प्रसंजीत व मृत प्रवीण दोन वर्षांपूर्वी संभाजी कॉलनीत शेजारी राहायचे. दोघेही चांगले मित्र होते. मात्र, त्यांच्यात एका मैत्रिणीवरून वाद झाल्याची माहिती आहे. एमजीएम महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतल्याच्या वेळी हा प्रकार घडला होता. सध्या आरोपी हिवाळे दुसऱ्या वर्षाला आहे. त्यावेळी झालेले वाद पुन्हा उफाळून आले होते. कॉलेज व परिसरातील मुले दोघांना देखील चिडवत होती. त्याने प्रवीणला फोनवर गोड बोलून चर्चेसाठी बोलावले आणि प्लॅनिंग करून त्याचा काटा काढला, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT