Mukhed HSC exam copy case  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

HSC Exam Copy Case | जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरणात 18 जणांचे निलंबन

सतरा शिक्षक आणि एका सेवकाचा समावेश, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या आदेशाने कारवाई

पुढारी वृत्तसेवा

18 people suspended in Jaitapur mass copying case

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान कनड तालुक्यातील जैतापूर केंद्रावर झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात अठरा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सतरा शिक्षक आणि एका सेवकाचा समावेश आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाठकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात १० फेब्रुवारीपासून राज्य मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली. यंदा कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा निर्धार शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर आणि त्यांचे सहकारी इंग्रजीच्या पेपरला कमड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर पोहचले. तिथे सीसीटीव्हीच्या नजरेखाली सामूहिक कॉपी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या केंद्रावर कार्यरत केंद्र संचालक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल केले.

शिक्षणाधिकार्यांच्या आदेशाने सखोल चौकशी करण्यात आली. संबंधित परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या काही पफशिक्षक व सेवक यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेज व अधिकृत अहवालांच्या आधारे सेवा नियमांनुसार तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन आदेशानुसार संबंधित कर्मचारी निलंबन कालावधीत मुख्यालय सोडू शकणार नाहीत. त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येईल.

यांच्यावर झाली निलंबनाची कारवाई

निर्मळ नथू, सचिन सातदिवे, नरेश सोनवणे, छाया मुंगे, आर. के. डरे, संतोष लिहिणार, अनंता गाडेकर, करणसिंग चंदवाडे, दीपक सोनवणे, बाळकृष्ण साळवे, संजय कडवे, संतोष भिंगारे, संजय दाभाडे, पी सी आव्हाळे, ऋषिकेश पाटील, राधा एकनाथ पैरे आणि एस. टी. घुगे (सेवक) यांचा निलंबितांमध्ये समावेश आहे.

परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, शिस्त आणि प्रामाणिकता अबाधित ठेवणे ही विभागाची सर्वोच्च जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारास मुळीच थारा दिला जाणार नाही. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परीक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे.
अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT