शेकडो विद्यार्थ्यांनी दिली पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा

पुढारी-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा संयुक्त उपक्रम : जिल्ह्यातील ८ केंद्रांवर सोडवला पेपर
sambhajinagar news
शेकडो विद्यार्थ्यांनी दिली पुढारी टॅलेंट सर्च परीक्षाfile photo
Published on
Updated on

Hundreds of students took the Pudhari Talent Search exam

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दै. पुढारी आणि आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर विभागात नुकतीच पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील ८ केंद्रांवर शेकडो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

sambhajinagar news
Sambhajinag Police: संभाजीनगरमध्ये ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले; पोलिस- महापालिकेची 'बुलडोझर' मोहीम, यादी वाचा

शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा व अन्य परीक्षांच्या धर्तीवर चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी भागवत कदम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. उद्धव वायाळ यांच्या प्रेरणेने तसेच दै. पुढारीचे सुनील लोंढे, व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, कार्यकारी संपादक विनोद काकडे, युनिट हेड अमोल कोल्हे, जाहिरात व्यवस्थापक अप्पासाहेब गोरे, अशोक विखे, राजेंद्र महाजन, विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाने शासकीय आश्रमशाळांमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शांततेत आश्रमशाळा मुख्याध्यापक, शिक्षकांच्या देखरेखीखाली पार पडली. ओएमआर शीटवर परीक्षा घेण्यात आली. पुढारीच्या टीमने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन केले.

परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना रोल नंबर देण्यात आले होते. त्यानुसार सर्व केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली नाही. परीक्षेबाबतची उत्कंठा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यांना बैठकव्यवस्था आणि पेपर कशा पद्धतीने सोडवावा, याबाबतचे मार्गदर्शन संबंधित शिक्षक आणि पुढारीच्या टीमने केले.

sambhajinagar news
अब्दुल सत्तारांच्या मंदिरातील प्रवेशाने वादंग

पालकांचा मोठा प्रतिसाद

परीक्षेदरम्यान आदिवासी प्रकल्पातील उच्चपदस्थ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन परीक्षा प्रक्रियेचे प्रत्यक्ष अवलोकन केले. अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण होणार असून, परीक्षा देण्याचा सराव होणार असल्याने टॅलेंट सर्च परीक्षा उपयुक्त आहे. नियमित होणाऱ्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावे यासाठी या उपक्रमाचा उपयोग होणार असल्याची प्रतिक्रिया अनेक पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केली.

या केंद्रांवर झाली परीक्षा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हट्टी, वडनेर, बामणी, नागद आणि तीसगाव, तर बीड जिल्ह्यातील शेंडाळा, सुरडी आणि थेटे गव्हाण या केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news