Crime News  pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून

दोन आरोपी अटकेत; मुख्य संशयित फरार, पोलिसांकडून शोध

पुढारी वृत्तसेवा

करमाड : मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून झालेल्या वादाचे पर्यवसान एका 17 वर्षीय विद्यार्थ्याच्या निर्घृण हत्येत झाले. अनिकेत अरुण राठोड (रा. शेवगा, ता. छत्रपती संभाजीनगर) या पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा धारदार चाकूने पोटात वार करून निर्घुन खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी दुधड-लाडसावंगी मार्गावरील दुधड शिवारात घडली.

या प्रकरणी करमाड पोलिसांनी श्रीकांत विलास राठोड (20) व अमोल संजय चव्हाण (दोघे रा. शेवगा) यांना अटक केली असून मुख्य संशयित ओमकार मधुकर ताकपिरे (रा. फेरण जळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत राठोड हा रोटेगाव येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रशिक्षण घेत होता. गेल्या महिनाभरापासून ओमकार ताकपिरे, स्वप्नील चांदणे अनिकेतला वारंवार फोन करून धमक्या देत होता. तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस? असा आरोप त्याच्यावर करण्यात येत होता. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्ग परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यावेळीही त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अनिकेतला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी अनिकेतला दुधड शिवारात बोलावण्यात आले. तेथे झालेल्या वादातून आरोपींनी त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. पोटात गंभीर वार झाल्याने त्याला तत्काळ करमाड येथील ग््राामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृताचा भाऊ कुणाल अरुण राठोड यांच्या फिर्यादीवरून करमाड पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

घटनेनंतर शेवगा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला. शनिवारी (दि. 30) दुपारी अनिकेत राठोड याच्यावर शेवगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने ग््राामस्थ उपस्थित होते. आई-वडिलांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. एका होतकरू विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT