1,100 runners participate in Run for Heritage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी मिशनच्या वतीने रविवारी (दि.७) एमजीएम रन फॉर हेरिटेज मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी झेंडा दाखवून रन फॉर हेरिटेजचे उद्घाटन केले. यामध्ये वयोगटातील सुमारे ११०० धावपटूंनी सहभाग नोंदविला.
यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलाचे कामांडंट विक्रम साळी, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, उद्योजक डॉ. रणजित कक्कड, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई आदी उपस्थित होते.
शहरातील वारसा स्थळांबाबत जनजागृती करीत नागरिकांना या माध्यमातून एकत्रित केले जाते. एमजीएम मॅरेथॉनचे यंदाचे हे दहावे वर्ष होते. या मॅरेथॉनमध्ये पुरुष आणि महिला गटामध्ये स्वतंत्रपणे १४ ते २०, २१ ते ३५ ३६ ते ४५, ४६ ते ५५, ५६ ते ६५ या वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. सुमारे ११०० धावपटूंनी ५ किमी आणि १० किमी स्पर्धेत सहभाग नोंदविला. विविध गटातील प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या मॅरेथॉनमध्ये विजयी खेळाडूंना एकूण १ लक्ष ६० हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा. शशिकांत सिंग, डॉ. श्रीनिवास मोतीयेळे, डॉ. सदाशिव जव्हेरी, ऐश्वर्या आघाव, प्रा. रहीम खान, डॉ. अमरदीप अस-ोलकर, बालाजी शेळके, जॉय थॉमस, अर्जुन तोडकर, लक्ष्मण सूर्यवंशी, सुनील चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे
पाच वेगवेगळ्या वयोगटात ही मॅरेथॉन पार पडली. यात दहा कि. मी. पुरुष गटातील स्पर्धांमध्ये गणेश पाखरे, विजय भोकरे, राकेश यादव, संतोष वाघ, भगवान कच्छवे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर दहा कि. मी. महिला गटात मनीषा पाडवी, गायत्री गायकवाड, विश्रांती गायकवाड, विठाबाई कच्छवे, आभा सिंग या प्रथम आल्या.