

Police maintain tight security outside the strong room
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील बॅडमिंटन हॉलच्या इमारतीत ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. १० पोलिस कर्मचारी २ डिसेंबरपासून पोलिस स्ट्रॉग रूमबाहेर २४ तास आळीपाळीने पहारा देत असून, २१ डिसेंबरपर्यंत हा पहारा असाच कायम राहणार आहे.
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले. पूर्वीच्या - वेळापत्रकानुसार तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर - होणार होता. मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत स्थगित झाली आणि - प्रशासनाच्या व पोलिसांच्या जबाबदारी अधिकची वाढली आहे.
अचानक मतदानाच्या दिवशी मतमोजणी निर्णय न्यायालयाच्या आदेशाने पुढे ढकल्याने आता ईव्हीएम मशीनच्या बॅटरी टिकतील का? बँटरी संपल्यावर त्या कधी कोण चार्ज करेल, अशी चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसह उमेदवारांनी स्ट्रॉग रूमबाहेर कडाक्याच्या थंडीत सतत पहारा देणे सुरू केले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील बँडमिंटन हाँलच्या इमारतीत ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या परिसरात १० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. आळीपाळीने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगराव सानप, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार हे आपल्या फौजफाट्यासह पाहणी करता आहे.
२४ तास प्रक्षेपण
उमेदवारासाठी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या हाँल अगदी लगत एका हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्रॉग रूमच्या आत आणि बाहेर ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचे २४ तास थेट प्रक्षेपण असल्यामुळे आत-बाहेरच्या हालचाली उमेदवारांना व अधिकाऱ्यांना स्पष्टपणे पाहता येत आहेत. स्ट्राँग रूमच्या गेटला कुलूप लावले असून, कॅमेऱ्याद्वारे त्यावरही सीसीटीव्हीची नजर आहे.