Bogus female IAS officer : बोगस महिला आयएएसकडे सापडले पेशावर आर्मीसह 11 इंटरनॅशनल नंबर्स File Photo
छत्रपती संभाजीनगर

Bogus female IAS officer : बोगस महिला आयएएसकडे सापडले पेशावर आर्मीसह 11 इंटरनॅशनल नंबर्स

'अपना डीलर पाकिस्तान में हैं' चा मॅसेजही सापडला : दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तपासाला वेग

पुढारी वृत्तसेवा

11 international numbers including Peshawar Army found with bogus female IAS officer

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

स्वतःचे घर असताना पंचतारांकित हॉटेलात सहा महिने मुक्काम ठोकणारी बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवतच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानच्या पेशावर आर्मीसह अफगाण दूतावास व अन्य ११ इंटरनॅशनल नंबर सापडल्याने सुरक्षायंत्रणा अक्षरशः हादरली आहे. तिने दिल्ली, राजस्थान, मणिपूर येथे वारंवार भेटी दिल्याने तसेच नुकत्याच झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा तपास अतिशय गंभीर व संशयास्पद ठरत असल्याचे सरकारी वकिलांनी बुधवारी (दि. २६) न्यायालयात स्पष्ट केले.

खाडाखोड केलेले आधार कार्ड, बनावट आयएएसची २०१७ सालची यादी बाळगून राहणाऱ्या कल्पना भागवतला शनिवारी (दि.२२) सिडको पोलिसांनी अटक केली होती. तिची पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा, आयबी, एटीएस, सीआयडीने कसून चौकशी सुरू आहे. बुधवारी पोलिस निरीक्षक अतुल येरमे, तपास अधिकारी एपीआय योगेश गायकवाड, जमादार दीपक देशमुख यांच्या पथकाने तिला न्यायालयात हजर केले. तेव्हा पोलिसांनी विविध धक्कादायक मुद्दे मांडले. तसेच सरकारी वकील जरीना दुर्रानी यांनी सांगितले की, स्वतःचे पडेगाव भागात घर असताना कल्पना सहा महिन्यांपासून हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये संशयास्पदरीत्या राहत होती. ती राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत होती,

हा घातक प्रकार आहे. दिल्ली येथे नुकताच बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे. हिच्याकडे संशयास्पद चॅटिंग, आंतरराष्ट्रीय नंबर्स मिळने याची चौकशी करणे गरजेची आहे. स्वतःला आयएसएस अधिकारी असल्याचे सांगून केलेले हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणारे कृत्य असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तिच्या चौकशीसाठी पोलिसांनी वाढीव दहा दिवसांची पोलिस कोठडी मागितल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. जवळगेकर यांनी मंजूर करत कल्पनाची ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

अपना डीलर पाकिस्तान में हैं तिचा अफगाणी मित्र अशरफचा पाकिस्तानमधील भाऊ गालिब यमासोबतचे चॅटिंग तिने डिलिट केले असले तरी अपना डीलर पाकिस्तान में हैं, मालूम है ना, असा मजकूर असलेला चॅटिंगचा स्क्रीन शॉट सापडला आहे. त्यामुळे कल्पना भागवतचा पाय आणखी खोलात गेला आहे.

आयएएस निवड यादी बनविणारे दोघे रडारवर लोकसेवा आयोग २०१७ ची बोगस निवड यादी मनोज लोढा आणि दत्तात्रय शेटे यांनी तयार करून दिल्याची कबुली कल्पनाने दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास आरोपींची संख्या वाढणार आहे. दोघांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका तपास अधिकारी योगेश गायकवाड यांनी न्यायालयात सांगितले की, कल्पना भागवतने पाकिस्तानच्या यमा सोबतचे संभाषण, चॅटिंग डिलिट केले. तिच्याकडे सापडलेल्या विविध इंटरनॅनल नंबर्स, अफगाणी मित्र या सर्व बाबी संशयास्पद असून, या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

दिल्ली, राजस्थान, मणिपूरला भ्रमण कल्पना भागवतने दिल्ली, जयपूर, उदयपूर, राजस्थान, मणिपूर अशा बऱ्याच ठिकाणी विमानाने वेळोवेळी प्रवास केल्याचे समोर आले. ती तिथे कोणाला भेटली? तिचा उद्देश काय होता, याचा तपास होणार आहे.

नागपूरच्या कुलगुरूचे प्रमाणपत्र घर झडतीत संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या लेटर हेडवर कल्पना हिला आयएएस संबोधून तिने सामाजिक व धार्मिक कार्य चांगल्या पध्दतीने केले असल्याचे प्रमाणपत्र सापडले आहे. हे बोगस आहे की खरे याचीही पडताळणी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT