Water Cut : १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात file photo
छत्रपती संभाजीनगर

Water Cut : १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात

जिल्हाधिकारी गौडा यांचा निर्णय : सिंचनाचे अवर्तने तातडीने बंद करा

पुढारी वृत्तसेवा

10% water cut from October 16

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मान्सूनत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसह जनावरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन करा, त्यासोबतच सिंचनाचे प्रस्तावित अवर्तने बंद करा, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत येत्या १६ ऑक्टोबरपासून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीत १० टक्के पाणी कपात करा, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मंगळवारी (दि. ६) दिले.

जिल्ह्यात मान्सूनात पावसाने मोठ्या प्रमाणात दडी मारली आहे. तब्बल ३० ते ३५ टक्यांची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये उन्हाळ्यात सुरू असलेले टँकर पावसाळ्यातही कायम राहिले. शिवाय, पावसाळा संपतात पुन्हा विविध गावांतून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात पाणी कपातीची तयारी आतपासूनच प्राशसनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व प्रथम पाणीपुरवठा विभागाने शहरात आणि गावांमध्ये पाणीपुरवठा करताना गळती शोधून काढण्याचे आदेशही दिले आहेत. गळती थांबल्यास मोठ्याप्रमाणात पाणी बचत होण्यास मदत मिळणार आहे.

दरम्यान, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यात यावेत. हे प्रक्रिया केलेले पाणी उद्याने, रस्ते दुभाजक, बांधकाम व औद्योगिक कामांसाठी वापरण्यात यावेत. औद्योगिक घटकांनी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर सुरू करावा, असेही त्यांनी आदेशात नमुद केले आहे.

ग्रामीण भागात गरजेनुसार खासगी विहिरी, जलसाठे अधिग्रहित करण्याची कार्यवाही प्रशासनाने तातडीने सुरू करावी. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक १५ दिवसांनी आढावा घ्यावा. तसेच त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील जिल्हाधिकारी गौडा यांनी दिला आहे.

सिंचनाचे अवर्तने बंद करा

धरणांमधून सिंचनासाठी सुरू असलेली किंवा प्रस्तावित पाणी आवर्तने बंद करावीत. पिण्याचे पाणी, घरगुती वापर, जनावरांची गरज व औद्योगिक वापराचे नियोजन केल्यानंतर उर्वरित पाण्यावरच सिंचनाचे नियोजन करावे. कमी पाणी लागणारी रब्बी व चारा पिके तसेच ठिबक व तुषार सिंचनाला प्रोत्साहन द्यावे.

मोटारी, पंप जप्तीचे आदेश

अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास विद्युत मोटारी, पंप, पाइपलाइन व अन्य साहित्य जप्त करण्यात येणार आहे. अनधिकृत वीज जोडणीद्वारे पाणी उपसा होत असल्यास वीजपुरवठा खंडित करून कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले.

अनधिकृत उपसा रोखण्यासाठी पथक

मोठे, मध्यम व लघु धरणांसह तलाव, नदी-नाले, विहिरी यातून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यात यावा. त्यासाठी तालुकानिहाय संयुक्त पथके स्थापन करण्यात यावेत. या पथकांत महसूल, पाटबंधारे, महावितरण, कृषी, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. पथकांनी अचानक तपासणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT