अजिंठा ; पुढारी वृत्तसेवा आजकाल आपण घोडा हा प्राणी लग्नात किंवा शर्यतीसाठी उपयोग करताना पाहतो, पण सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील एका शेतकऱ्याने बैलाऐवजी घोड्याच्या सहाय्याने शेती करण्यास सुरूवात केली. त्यामुळे हा प्रकार तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पिंपळदरी येथील शेतकरी कडुबा श्रीरंग दौड यांना बैलाच्या पटाचा शौक असल्याने त्यांनी घोड्याची बछडे प्रत्येकी ७००० हजार रुपये प्रमाणे खरेदी केले. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम तसेच त्याच्याकडे शेती करण्यासाठी बैल जोडी नव्हती. त्यात ट्रॅक्टरने मशागत करणेही त्यांना परवडत नसल्याने त्यांनी शेतीत अनोखा प्रयोग करण्याचे ठरवले.
शेतीच्या मशागतीसाठी बैल जोडीची कमतरता आणि ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले असल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकरी कडूबा श्रीरंग दौड यांनी अनोखा प्रयोग केला. आवड म्हणून घोडे पोसले. जमीन करण्यासाठी बैल नव्हते. शेतकऱ्याने चक्क दोन घोड्यांना औताला जुंपले. उन्हाळयात शेताची वखरणीचे काम घोड्याच्या सहाय्याने केले जात आहे. विशेष म्हणजे याच घोड्यावरून शेतात ये-जा आणि किरकोळ शेती साहित्याची वाहतूक हा शेतकरी करतो. वखरणी, उन्हाळी मिरची आणि कापूस पिकाच्या कोळपणीसाठीही बैलांपेक्षा दुप्पट गतीने हे घोडे काम करत आहेत.
बैलजोडी घेणे परवडत नाही. त्यामुळे केवळ शौक म्हणून पाळलेल्या घोड्यांना काहीतरी काम असावं. म्हणून कडुबा श्रीरंग दौड यांनी बैलांप्रमाणेच बदल करून हा शेतकरी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घोड्यावर शेती करत आहे. शेतातील मशागतीचे काम जलद गतीने करीत आहेत.
बैलजोड्यांच्या किमती वाढल्याने शेतात कोळपण्यासाठी चक्क घोड्यांनाच जुंपले"
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकरी कडूबा श्रीरंग दौड हे त्यांच्या वेगळ्याच जुगाडसाठी चर्चेत आले. त्यांनी शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडी मिळाली नाही. त्यांनी चक्क घोड्याला कामाला लावले.
घोडा सक्रिय राहिल्यास आरोग्य उत्तम : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकऱ्यांनी अनोखा प्रयोग केला. आवड म्हणून घोडे पोसले. जमीन करण्यासाठी बैल नव्हते. ट्रॅक्टरचे भाडे इंधन दरवाढीने वाढले. मग त्यांनी या घोड्यांना प्रशिक्षण दिले. ते आता शेतीच्या कामात येत आहेत. घोडे थकत नाही त्यांना चारा कुट्टी हिरवा चारा दान देण्याची गरज नाही. असे जुने लोक सांगतात.
"शेतकऱ्यांनी घोड्यावर शेती करण्याचा प्रयोग सुरू केला आहे."जलद गतीने होतात कामे
दिवसेंदिवस शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि संकल्पना उदयास येत आहेत. बैलजोडीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही काही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बैल मिळत नाहीत. ट्रॅक्टरचे भाव परवडत नाहीत. त्यामुळे कडूबा दौड यांनी पाळलेल्या घोड्यांना थेट औताला जुंपले आहे. बैलाऐवजी शेतीचे काम गेल्या दोन तीन वर्षापासून घोड्याने करीत असून बैलापेक्षा घोडे जलद गतीने कामे करत आहेत, असे मत कडूबा दौड या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे.
सध्या ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत ते इतरांकडून दिड ते दोन हजार भाडे घेतात. त्यामुळे आम्ही हि सर्व शेती घोडयाच्या सहाय्यने करतो. त्यामुळे आता आम्हाला जरा ही शेती परवडती. ज्यावेळेस आम्ही घोडा औताला जुंपतो, त्यावेळेस येणारी जाणारी लोक कुतूहलाने पाहत बसतात. पण आम्हा गरिबाला हा घोडा लय कामाचा हाय!
कडूबा दौड, शेतकरी
हेही वाचा :