मराठवाडा

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत दिव्यांग तरुणाचा सहभाग; राहुल गांधींच्या भेटीने अब्दूलचा आनंद द्विगुणित

backup backup

पिराजी वसु (हिंगोली); पुढारी वृत्तसेवा : खा. राहुल गांधी नेतृत्व करत असलेली भारत जोडो यात्रा सध्या हिंगोलीत आहे. या यात्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून अनेकजण यात्रेत सहभागी होत आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथील एक २५ वर्षीय दिव्यांग यात्रेत सर्वांसोबत चालताना दिसत आहे. अब्दूल मुदत्सर अन्सारी असे या दिव्यांग युवकाचे नाव आहे. तो देगलूरपासून सहभागी झाला आहे. राहुल गांधी यांना गरिबांबद्दल जाणीव आहे. काँग्रेस एक विचारधारा असून त्याला प्रेरित होऊन मी राहुल गांधींसोबत चालणार असल्याचे या युवकाने सांगितले. (Bharat Jodo Yatra)

कन्याकुमारीपासून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा नांदेडमार्गे आता हिंगोलीत आली आहे. देगलूर येथून प्रत्येक दिवशी ठराविक अंतर कापत ही यात्रा हिंगोलीत दाखल झाली. महाराष्ट्रात दाखल झाल्यापासूनच यात्रेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. देशभरातून अनेक संघटना, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य यामध्ये रोज दाखल होत आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथील दिव्यांग अब्दूल अन्सारी हा काँग्रेसच्या विचारधारेपासून प्रेरित झाला. देगलूर येथून तो यात्रेत सहभागी झाला. दोन्ही पाय आणि हाताने तो अधू आहे. तरीही त्याच्या उत्साहात जराही कमतरता जाणवत नाही. इतर पदयात्रेकरुंसोबत अब्दुल पुढे जात आहे. (Bharat Jodo Yatra)

काँग्रेसची विचारधारा आणि राहुल गांधी यांच्यापासून प्रेरित होत यात्रेसोबत चालणार्‍या दिव्यांग अब्दूलला पाहून इतरांनाही प्रेरणा मिळत असल्याचे पदयात्रींनी सांगितले. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अब्दूलचे किराणा दुकान आहे. अब्दूलची जिद्द पाहून पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांनी त्यास बोलावून घेतले. विचारपूस करत त्याच्याबद्दल जाणून घेतले. या भेटीमुळे त्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे. तो या यात्रेत बुलढाणापर्यंत चालणार आहे. यापूर्वी त्याने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली आहे. राहुल गांधी हे कोणालाही सहज भेटणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांना गरिबांबद्दल जाणीव आहे. ते मला भेटले, माझी विचारपूस केल्याने मी आनंदी आहे. असे मत त्याने यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT