वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे झाड कोसळून महिलेचा दुर्देवी मृत्‍यू  file photo
बीड

वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे झाड कोसळून महिलेचा दुर्देवी मृत्‍यू

माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे ही घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Woman Meets Tragic End After Neem Tree Collapses Amidst Gusty Winds

माजलगाव : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मोगरा येथे शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील लिंबाचे झाड कोसळून सुमनबाई हरिभाऊ घनघाव या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मोगरा येथे शुक्रवारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे एक दुर्दैवी अपघात घडला. शेतात असताना लिंबाचे झाड अचानक कोसळले. यावेळी झाडाची फांदी सुमनबाई हरिभाऊ घनघाव यांच्या पोटात घुसली. या गंभीर जखमेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना माजलगाव व संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुमनबाई या शेळ्या राखण्याचे काम करत होत्या तसेच त्या घनघाव कुटुंबातील कुटुंबप्रमुख होत्या.

त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून मोगरा गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघाती मृत्यूची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT