Majalgaon Girl Death | दुर्दैवी घटना: झोका खेळताना गळफास लागून नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरातील घटनेने हळहळ
Death of minor in Majalgaon
वृंदा समीर रुद्रवार Pudhari
Published on
Updated on

Death of minor in Majalgaon Beed

माजलगाव : घरातील झुल्याला बांधलेल्या झोक्यावर खेळताना गळ्याला फास लागून नऊ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माजलगाव शहरात मंगळवारी (दि.३१) घडली. वृंदा समीर रुद्रवार असे मृत मुलीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी प्रदीप रुद्रवार यांचे खंडोबा मैदान परिसरात निवासस्थान आहे. मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांची नात वृंदा (वय ९) ही आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर झोका खेळण्यासाठी गेली होती. यावेळी खुर्चीवर उभे राहून झोका हातात घेत असताना अचानक तिच्या गळ्याला फास बसला आणि खुर्ची खाली घसरल्याने ती अडकली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.

Death of minor in Majalgaon
Beed News : परळी वैजनाथमध्ये दोन ठिकाणी वीज कोसळली; शेतकऱ्याचा मृत्यू; दुसऱ्या घटनेत बैल दगावला

दरम्यान, मुलगी जेवण्यासाठी खाली का येत नाही हे पाहण्यासाठी तिची आई वर गेली असता हा प्रकार तिच्या निदर्शनास आला. मुलीला त्या अवस्थेत पाहताच तिने आक्रोश केला. तात्काळ आजी, आजोबा व वडील घटनास्थळी धावून आले आणि वृंदाला रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

वृंदा ही चुणचुणीत व गोंडस मुलगी होती. ती येथील दुसरी इयत्तेत शिक्षण घेत होती. तिच्या अकाली निधनामुळे रुद्रवार कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news