वक्फ बोर्डाची ट्रिब्युनलकडे धाव; काळजी करू नका, नोंदणी पूर्ण करणारच : अध्यक्ष काझी File Photo
बीड

वक्फ बोर्डाची ट्रिब्युनलकडे धाव; काळजी करू नका, नोंदणी पूर्ण करणारच : अध्यक्ष काझी

महाराष्ट्रातील मस्जिद, दरगाह, कब्रस्तान आदी वक्फ संस्थांची उम्मीद पोर्टलवरील नोंदणीची अंतिम मुदत ५ डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Waqf Board moves tribunal; Don't worry, registration will be completed: Chairman Qazi

बीड, पुढारी वृत्तसेवा :

महाराष्ट्रातील मस्जिद, दरगाह, कब्रस्तान आदी वक्फ संस्थांची उम्मीद पोर्टलवरील नोंदणीची अंतिम मुदत ५ डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे. बहुतांश संस्थांची नोंदणी पूर्ण झाली असली तरी काही संस्था कागदपत्रांच्या कमतरतेमुळे अडल्या आहेत. यावर चिंता करू नये, सर्वांची नोंदणी करूनच घेणार असल्याचा विश्वास वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ नाकारली असली तरी ट्रिब्युनलकडे जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार महाराष्ट्र वक्फ बोर्डाने आजच ट्रिब्युनलकडे धाव घेतली असून मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकही वक्फ संस्था नोंदणीविना राहणार नाही, असे काझी यांनी सांगितले. राज्यातील ३६ हजार संस्थांपैकी ३० हजार वक्फ प्रॉपर्टीज पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. हज हाऊसमध्ये ३०० तंत्रज्ञ नियुक्त करून नोंदणी गतीने केली गेली.

बोर्डाचे अधिकारी-कर्मचारी अतिरिक्त वेळ देत काम करत आहेत. वक्फ न्यायाधिकरणाने केंद्राला १० डिसेंबरपर्यंत का वेळ वाढवू नये याचा खुलासा मागितला आहे.. त्यामुळे मुदतवाढीची शक्यता वाढली असून मुतवल्लींना दिलासा मिळाला आहे.

सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांना उत्तर देताना अध्यक्ष काझी म्हणाले की वेळ वाढवलेली नाही, न्यायाधिकरणातून अपेक्षा, ट्रिब्युनलमध्ये निर्णयाची जाणाऱ्यांना पेनल्टी नाही, अपलोड केलेल्यांना ३ महिने 'चेकर अनुवल'साठी लागणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, पोर्टलवर नोंदणी तातडीने करा, असे आवाहन हि त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT