वाळू उपसा करताना नियमांचा भंग Pudhari File Photo
बीड

वाळू उपसा करताना नियमांचा भंग

हिवरा वाळूघाटावरील प्रकार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Violation of regulations during sand extraction

टाकरवण, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील हिवरा वाळूघाटावर वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात आ लेली आहे. परंतु या ठिकाणी वाळू उपसा हा नियमांपेक्षा अधिक व यंत्राच्या सहाय्याने केला जात आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून या विर-धात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

माजलगाव तालुक्यातील टाकरवणपासून जवळच असलेल्या हिवरा वाळूघाटावर वाळू उपशाचे टेंडर मंजूर झालेले आहे. टेंडर मंजूर करताना नियमांचा भंग केला जात आहे. पोकलेनच्या सहाय्याने हा वाळू उपसा केला जात असून हे करत असताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्याकडे अधिका-यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व प्रकाराची आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन आतापर्यंत झालेल्या वाळू उपशाचे मोजमाप करावे तसेच गैरप्रकार झालेला असल्यास दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT