Beed News : दुष्काळाच्या सावटाने लाखमोलाची जनावरे अर्ध्या किमतीत; दोनच महिन्यात बाजारात चित्र बदलले file photo
बीड

Beed News : दुष्काळाच्या सावटाने लाखमोलाची जनावरे अर्ध्या किमतीत; दोनच महिन्यात बाजारात चित्र बदलले

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीनंतर दोन महिन्यांपूर्वी दुधातील भेसळीला लगाम बसला होता. त्यामुळे दुधाची मागणी वाढून दुभत्या गायी-म्हशींना लाखो रुपयांची किंमत मिळत होती. मात्र अवघ्या दोन महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Under the shadow of drought, precious livestock sold at half price

मनोज गव्हाणे

नेकनूर : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीनंतर दोन महिन्यांपूर्वी दुधातील भेसळीला लगाम बसला होता. त्यामुळे दुधाची मागणी वाढून दुभत्या गायी-म्हशींना लाखो रुपयांची किंमत मिळत होती. मात्र अवघ्या दोन महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. पाऊस न पडल्याने येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याआधीच जनावरे विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नेकनूरच्या आठवडी बाजारात एकेकाळी लाखमोलाच्या असणाऱ्या गायी, म्हशी व शेळ्यांच्या किंमती थेट अर्ध्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दोन महिन्यांपूर्वी दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शुद्ध दुधाला मागणी वाढली होती. त्याचा थेट फायदा दुभत्या जनावरांच्या किमतींना झाला होता. चांगल्या दुभत्या म्हशीला 1 लाख ते 1.20 लाख रुपये, तर गाईला 70 ते एक लाख रुपये मोजावे लागत होते. परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर चारा-पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार असल्याची भीती आहे. त्यामुळे सांभाळण्याचा खर्च परवडणार नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात जनावरे बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सध्या नेकनूरच्या आठवडी बाजारात परिस्थिती पूर्णपणे बदलली दुभती म्हैस पूर्वी 1 लाख - 1.20 लाख असणारी म्हैस आता 60 ते 70 हजारांपर्यंत आली आहे. दुभती गाय 70-90 हजारांची गाय आता 40 ते 60 हजारात मिळत आहे.

18-20 हजार रुपयांना मागत असलेली शेळी आता 10 ते 12 हजारांपर्यंत खाली आली आहे. मात्र बाजारात विक्रेते जास्त आणि खरेदीदार कमी असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. अनेक शेतकरी नाईलाजाने कमी किमतीत जनावरे विकत आहेत. नेकनूरच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे आल्याचे चित्र येणाऱ्या काळातील दुष्काळाची दहाकता दाखवणारी आहे.

पाऊस नाही, चारा महाग झाला आहे. येणाऱ्या काळात पाणी समस्या उभी राहणार त्यामुळे आता जनावरे सांभाळणे अवघड आहे म्हणून विकायला आणले, पण भावच नाही अशी खंत मुंडेवाडी येथील शेतकरी श्रीराम मुंडे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT