Yamai Devi : नवसाला पावणारी जातेगावची आई यमाई

जातेगाव पंचक्रोशीत भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा जागर
Yamai Devi
Yamai Devi : नवसाला पावणारी जातेगावची आई यमाईfile photo
Published on: 
Updated on: 

Goddess Yamai of Jategaon, who grants the wishes of her devotees

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या भूमीत अनेक प्राचीन आणि श्रद्धेची परंपरा जपणारी देवस्थाने आहेत. या देवस्थानांमध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेल्या जातेगावच्या आई यमाई देवीच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती आणि लोकपरंपरेचा वारसा जपणाऱ्या या देवस्थानात नवरात्रोत्सव तसेच पौष पौर्णिमेच्या वार्षिक यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते. महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील भाविकही देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. 'नवसाला पावणारी आई यमाई' अशी या देवीची भाविकांमध्ये श्रद्धापूर्ण ओळख आहे.

गेवराई तालुक्यातील जातेगाव हे गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले गाव आहे. नदीचे सान्निध्य, परिसरातील धार्मिक परंपरा आणि देवीवरील भाविकांची श्रद्धा यांमुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक परंपरेनुसार, हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. कालौघात मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने त्याला भव्य आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वाभिमुख मंदिराची रचना अंतरगाभारा, गाभारा आणि सभामंडप अशा भागांत विभागलेली आहे.

मंदिरासमोरील उंच दीपमाळा आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळील दगडी कासव ही मंदिर परिसराची वैशिष्ट्ये आहेत. पारंपरिक स्थापत्यशैलीची झलक या वास्तूतून पाहायला मिळते. हिंदू धार्मिक परंपरेत यमाई देवीला आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. महाराष्ट्रातील विविध भागांत यमाई देवीची मंदिरे असून, तिच्या स्वरूपाविषयी आणि नावाविषयी वेगवेगळ्या आख्यायिका प्रचलित आहेत.

काही परंपरांमध्ये देवीचा संबंध रेणुकामाता आणि पार्वतीच्या स्वरूपाशी जोडला जातो. जातेगावच्या यमाई देवीबाबतही भाविकांमध्ये अशाच श्रद्धा प्रचलित आहेत. जातेगावच्या मंदिरातील देवीची मूर्ती शेंदूरचर्चित असून तिला सुवर्ण-रजत मुखवटा आणि भरजरी वस्त्रे परिधान केली जातात. देवीच्या दर्शनाने मनाला समाधान मिळते आणि संकटांतून मार्ग मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

नवरात्रौत्सवात भक्तीसा जागर

नवरात्रोत्सवाबरोबरच पौष पौर्णिमेला भरणारी वार्षिक यात्रा हे या देवस्थानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविकही येतात. याशिवाय मंगळवार, शुक्रवार, रविवार, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते. गेवराई तालुक्यातील जातेगावचे हे श्रद्धास्थान धार्मिक परंपरा आणि लोकविश्वासाचा वारसा जपत आहे. नवरात्रोत्सव असो किंवा पौष पौर्णिमेची यात्रा, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भक्तीतून या देवस्थानाचे महत्त्व अधोरेखित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news