केज शहरातून दोन महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता File Photo
बीड

Kej girls missing case : केज शहरातून दोन महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

वडिलांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद

पुढारी वृत्तसेवा

केज ः मागील दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनेत केज शहरातील दोन महाविद्यालयीन युवती बेपत्ता झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

केज तालुक्यातील नामेवाडी येथील जयश्री मधुकर केदार वय (22 वर्ष) ही शहरातील जीवन शिक्षण कॉलेजमध्ये बी एस्सी द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ती आपल्या वडिलांसोबत 4 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता कॉलेज मध्ये परीक्षा फी भरण्यासाठी आले होते. फी भरल्या नंतर ते दोघे पोर्चमध्ये कठड्यावर सावलीला बसले होते.

दुपारी 2 वाजता जयश्री केदार ही तरुणी वडिलांना न सांगता त्यांची नजर चुकवून बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेतला असता तिचा तपास लागला नाही. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत काळेगाव (घाट) येथील योगेश्वरी नंदकिशोर कोठावळे वय (18 वर्षे) ही शहरातील भाऊसाहेब पाटील अध्यापक शिक्षण घेत आहे. दि. 2 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता ती विद्यालयातून कोणालाही न सांगता निघून गेली. तिच्या वडिलांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT