Truck collapses in front of team inspecting work
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत सोन्न-ाखोटा ते खडकी मार्गावरील पुलाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकारी, ग्रामस्थांसमोरच खताची वाहतूक करणारा ट्रक कोसळला. यावेळी पाहणी करणारे अधिकारी बालंबाल बचावले.
वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा ते खडकी असा नऊ किमी अंतर अस-लेला रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेमधून मंजूर झाला आहे. सिमेंट रस्त्याचे काम असून, त्यासाठी नऊ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुरेसा निधी असतानाही गुत्तेद ाराने ग्रामीण भाग असल्याने कोणी लक्ष देणार नाही हे गृहित धरून रुई (पिंपळा) गावाजवळील पुलांचे काम सुरू करताना व्यवस्थित पर्यायी रस्ता बनविला नाही.
अरुंद व कुमकुवत पर्यायी रस्ता बनविल्यामुळे या मार्गावर जड वाहतूक करणे शक्य नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून खडकीतील विद्यार्थिनींना शाळेत जाणे जमले नाही. यासंदर्भात विद्यार्थिनीने कार्यकारी अभियंता एम. एम. पाटील यांना निवेदन दिले होते.
या पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता पाटील आले असता अरुंद मार्गावरून जाणारा ट्रक त्यांच्यासमोरच पलटला. हा ट्रक अधिकारी, ग्रामस्थ यांच्या दिशेने उलटत असल्याचे लक्षात येताच उपस्थितांची एकच धावपळ उडाली. या घटनेमध्ये नारायण रामकिसन राकुसले, फुलचंद भीमराव खराडे हे दोन जण जखमी झाले. अपघातामध्ये ट्रक व त्यात असलेला खतांच्या पोत्याचे मोठे नुकसान झाले.
पालकांनी दिलेल्या निवेदनानुसार वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा ते खडकी रस्त्यावरील पुलाची पाहणी करण्यासाठी आलो असता माझ्यासमोरच पर्यायी रस्त्यामध्ये ट्रक कोसळला. माझ्यासह अनेक जण बालंबाल बचावले आहेत. संबंधित गुत्तेदाराला नोटीस बजा-वणार असून, पूल, पर्यायी रस्त्याचे काम दर्जेदार केले जाईल, असे कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले.