Beed News : तळणेवाडी शिवारात तीस एकर ऊसाला आग File Photo
बीड

Beed News : तळणेवाडी शिवारात तीस एकर ऊसाला आग

तळणेवाडी शिवारात वीज वितरण कंपनीच्या डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) ची मनी फुटल्यामुळे अचानक आग लागून सुमारे तीस ते चाळीस एकर ऊस पिक जळून खाक झाला.

पुढारी वृत्तसेवा

Thirty acres of sugarcane caught fire in Talnewadi Shivara

गेवराई, पुढारी वृत्तसेवाः तळणेवाडी शिवारात वीज वितरण कंपनीच्या डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) ची मनी फुटल्यामुळे अचानक आग लागून सुमारे तीस ते चाळीस एकर ऊस पिक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी (दि. १३) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे ३५ ते ४० लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या आगीत धर्मराज शिंगाडे, गणेश शिंगाडे, शिवाजी शिंगाडे, सुदाम एडके, माधव एडके, विलास वाघमोडे व बप्पासाहेब वाघमोडे या शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ऊस काढणीच्या तोंडावर असताना ही दुर्घटना घडल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित डीपीबाबत महावितरणकडे यापूर्वीही अनेक वेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या, अशी माहिती शेतकरी शिवाजी शिंगाडे यांनी दिली.

मात्र, वेळेत दखल न घेतल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणकडून तातडीने पंचनामा करून योग्य भरपाई देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT