Kej Crime : चालत्या ट्रकवर चढून माल चोरी करणारे पकडले; केज पोलिसांची कारवाई Pudhari
बीड

Kej Crime : चालत्या ट्रकवर चढून माल चोरी करणारे पकडले; केज पोलिसांची कारवाई

महामार्गावरून धावत्या ट्रकवर चढून ताडपत्री फाडून आतील मद्य चोरी प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

Thieves stealing goods by climbing onto a moving truck apprehended; action taken by Kej police

केज, पुढारी वृत्तसेवा : महामार्गावरून धावत्या ट्रकवर चढून ताडपत्री फाडून आतील मद्य चोरी करणाऱ्या चोराचा पाठलाग करून पोलिसांनी अवघ्या एक तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

15 जून रोजी छत्रपती संभाजी नगर येथून किंगफिशर कंपनीचे मध्य घेऊन निघालेली ट्रक हा मांजरसुंबा - केज मार्गावरून धावत असताना केज येथील कोरेगाव फाटा ते टोल नाक्या दरम्यान एका चोरट्याने त्या धावत्या ट्रकवर चढून आतील किंगफिशर या मद्याचे 42 हजार 120 रुपये किमतीचे 13 बॉक्सची चोरी केली. त्यानंतर ही घटना चालकाच्या निदर्शनास येताच त्याने केज पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने यांना आदेश दिले. आदेश मिळताच पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने आणि त्यांच्या पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, नितीन वारे, दादासाहेब देवगुडे, राहुल तरकसे यांनी चोरट्यांचा माग काढला आणि त्याच्या वर्णना वरून मिळालेल्या माहिती आधारे महादेव कल्याण पवार याच्या कोरेगाव ता. केज येथे घराची झडती घेतली असता त्याने घरात ठेवलेले मद्य आढळून आले. दरम्यान पोलिस घरी आल्याची मिळताच चोरटा पळून जाऊ लागला असताना पोलिसा पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्याला ताब्यात घेतले.

उसाच्या फडात बसला होता लपून

पोलिस मागे लागतच चोरटा महादेव कल्याण पवार हा उसाच्या शेतात जाऊन लपून बसला. त्या नंतर पोलिस पथकाने उसाच्या शेतात त्याचा शोध घेऊन एक तासाच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतलेला चोरटा महादेव कल्याण पवार हा सराईत चोर असून त्याने चोरी करताना त्याने अंगात घातलेल्या पँटच्या मागील बाजूला टायरचे रबर बसविले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT