Beed Crime | धावत्या ट्रकची ताडपत्री फाडून मद्यचोरी; फिल्मी स्टाईल पाठलागानंतर सराईत जेरबंद

मांजरसुंबा-केज मार्गावरील कोरेगाव फाटा ते टोलनाका दरम्यान कारवाई
 kej Truck Liquor Theft
केज पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सराईताला ताब्यात घेतले Pudhari
Published on
Updated on

kej Truck Liquor Theft

केज : महामार्गावर धावत्या ट्रकवर चढून ताडपत्री फाडत आतील मद्याचे बॉक्स चोरणाऱ्या सराईत चोरट्याला केज पोलिसांनी अवघ्या एका तासात शिताफीने शोधून काढत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ताब्यात घेतले.

बुधवारी (दि. १५) छत्रपती संभाजीनगर येथून किंगफिशर कंपनीचे मद्य घेऊन ट्रक (क्र. एमएच-२०/ईएल-७३८६) केजकडे येत होता. मांजरसुंबा-केज मार्गावरील कोरेगाव फाटा ते टोलनाका या दरम्यान एका चोरट्याने धावत्या ट्रकवर चढून ताडपत्री फाडली आणि ट्रकमधील मद्याचे बॉक्स लंपास केले.

 kej Truck Liquor Theft
Beed News | क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे टोल नाक्यावर पाऊण तास चक्काजाम आंदोलन

ही बाब चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तातडीने केज पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तपासाची सूत्रे हाती घेत डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने यांना आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले.

पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, नितीन वारे, दादासाहेब देवगुडे आणि राहुल तरकसे यांनी आरोपीचा माग काढला. मिळालेल्या गोपनीय माहिती व आरोपीच्या वर्णनाच्या आधारे त्याच्या घराची झडती घेतली असता घरात चोरीस गेलेले मद्य आढळून आले.

पोलिस आपल्या घरी पोहोचल्याची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढला. मात्र पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू करून त्याला काही अंतरावर जेरबंद केले.

या प्रकरणात चोरीस गेलेल्या मुद्देमालाची पडताळणी सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख आणि पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने पुढील तपास करत आहेत.

 kej Truck Liquor Theft
Beed Crime : खासगी शाळेच्या सेवकाचा संशयास्पद मृत्यू

उसाच्या फडात लपला; तरीही पोलिसांनी पकडले

पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपीने उसाच्या फडात लपून बसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पथकाने शेतात कसून शोधमोहीम राबवत अवघ्या एका तासात त्याला ताब्यात घेतले.

ताब्यातील आरोपी सराईत चोर

पोलिसांच्या ताब्यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. चोरी करताना स्वतःचे संरक्षण व्हावे आणि धावत्या वाहनावर सहज चढता यावे, यासाठी त्याने परिधान केलेल्या पँटच्या मागील बाजूस टायरच्या रबराचा थर बसविल्याचेही तपासात उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news