The turi crop is in full swing this year in the Kada area.
कडा, पुढारी वृतसेवा : आष्टी तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टी व महापुराने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असले तरी ज्या शेतकऱ्यांनी तूर पेरणी केली होती व ज्यांचे तूर पिक वाहून गेले नाही. अशा शेतकऱ्यांची तुरीचे पीक सध्या जोमात असून सहा ते सात फुटापर्यंत तुरीची वाढ झाली आहे. त्यामुळे फवारणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांकडे पडत असताना तालुक्यातील टाकळसिंग येथील नागनाथ जगताप यांनी आपल्या दोन एकर तुरीच्या पिकांवर ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीकडे वळले आहेत.
शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करीत आहेत परंतु त्यांना पाहिजे त्याप्रमाणात निसर्गाची साथ मिळत नाही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सोसायटीचे व्हाईस चेअरमन नागनाथ पांडुरंग जगताप यांनी अतिशय कष्टातून शेती फुलवली आहे.
त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा संतोष दुध व्यवसायात आहे. एकुण १४ गायी असुन ९५ लिटर दुध डेअरीला जात आहे. त्यांचा दुसरा मुलगा दादासाहेब हा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्याकडे तुरीचे दोन एकर पिक व लिंबूची तीन एकर बाग तसेच सीताफळाचे अडीच एकर क्षेत्र आहे. पंचक्रोशीतील लोकांनी या कुटुंबाचा आदर्श घ्यावा अशा प्रकारे शेती विकसित केली आहे. सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुपेकर व कृषी अधिकारी गोरख तरटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे दादासाहेब जगताप यांनी सांगितले.