Cannabis Seized | धुमेगाव हादरले! बीड गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईने एकाच शेतातून 490 क्विंटल गांजाची झाडे जप्त

Cannabis Seized | बीड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धडाकेबाज कारवाई करत जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी गांजा विरोधी मोहीम यशस्वी केली आहे.
Cannabis Seized
Cannabis Seized
Published on
Updated on

गेवराई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धडाकेबाज कारवाई करत जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी गांजा विरोधी मोहीम यशस्वी केली आहे. गेवराई तालुक्यातील धूमेगाव परिसरात एका शेतात अवैधरित्या केलेली तब्बल ४९० क्विंटल (४९ टन) गांजाच्या झाडांची लागवड उघडकीस आणत ती जप्त करण्यात आली. या कारवाईत गांजा आणि संबंधित साहित्य असा एकूण १ कोटी ३७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, गांजाची लागवड करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Cannabis Seized
Tie and Dye Workshop | रंगांची उधळण! सहारा अनाथालयात "टाय-अँड-डाय" उपक्रमाने फुलला सर्जनशीलतेचा उत्सव

ही अभूतपूर्व कारवाई धूमेगाव येथील गट क्र. १८९ मधील नारायण मगर यांच्या मालकीच्या शेतात करण्यात आली. आरोपी मगर आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात गांजाची शेती करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

बीडचे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक एस. डी. बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कसून नियोजन करत काल (दि. १ नोव्हेंबर) दुपारपासून रात्री उशिरापर्यंत हा छापा टाकला.

या कारवाईत न्यायवैद्यक पथक, महसूल विभाग आणि चकलांबा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तपासणीदरम्यान शेतात शेकडो गांजाची झाडे आढळून आली, ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

Cannabis Seized
Crime News Gevrai | गेवराईत चोरांचा सुळसुळाट! आडपिंप्री येथे घर फोडून 56 हजारांचा ऐवज लंपास

आरोपी नारायण मगर सुरुवातीला पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी, स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्ष पथकाने अखेरीस त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही बीड जिल्ह्याच्या इतिहासातील गांजाविरोधातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

सदर यशस्वी कारवाई बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनित कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. या मोहिमेत चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश गडवे, गोविंद राख, विकास राठोड, अंकूश वरपे, सुनील राठोड यांच्यासह स्थानिक महसूल व न्यायवैद्यक पथकाचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

आरोपीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या कामगिरीबद्दल बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news