ऊस आंदोलनाची व्याप्ती जिल्ह्याबाहेरही वाढली File Photo
बीड

Beed News : ऊस आंदोलनाची व्याप्ती जिल्ह्याबाहेरही वाढली

शेकडो शेतकऱ्यांचा फौजफाटा विविध कारखान्यांवर धडकला

पुढारी वृत्तसेवा

The scope of the sugarcane movement has expanded beyond the district.

बीड, पुढारी वृत्तसेवाः ऊस उत्पादक संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या कोयता बंद, वाहतूक बंद आंदोलन करत असून या आंदोलनाची व्याप्ती जिल्ह्याबाहेर पोहचली असून ऊसाचा ग्रीन बेल्ट असलेल्या परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील असंख्य गावातील शेतकरी यांनी समितीला पाठींबा देत शेतकऱ्यांनी आपली ऊस तोड व ऊस वाहतूक थांबवली आहे. यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीन समितीत सामील होऊल पेक्षा अधिक वाहनाद्वारे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांना भेटी देत आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

कारखानदार ऊस दरवाढीबाबत शेतकरी, साखर यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कारखानदारांनी कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली. ऊस दर बाबत कोणताही निष्कर्ष निघाला नसल्याने ऊस आंदोलन चिघळले आहे. जिल्ह्यातील ऊस तोड, ऊस वाहतूक ठप्प झाली असून काही साखर कारखाने बंद तर उर्वरित येत्या काही दिवसात ऊसाची आवक नसल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

अशातच शुक्रवार दि २८ रोजी शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वाहनांच्या ताफ्याद्वारे जिल्ह्यातील ओंकार शुगर्स पांगरी, अंबा साखर अंबाजोगाई, येडेश्वरी शुगर्स केज, गंगा माऊली शुगर्स केज या ठिकाणी ल शेतकरी समितीने भेटी देऊन सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ऊसासाठी प्रत्येक टनासाठी ३५५५ रुपये दर १०.२५ रिकव्हरीला जाहीर केला आहे. आपणाकडे ११ किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी रिकव्हरी लागत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेता प्रती टन ३ हजार रू. पहिली उचल तर ४ हजार रुपये अंतिम दर मिळाला पाहीजे ही मागणी निवेदने करून केली.

याबाबत जिल्हाधिकारी, बीड व साखर सहसंचालक छ. संभाजीनगर विभाग यांना देखील कळवण्यात आले आहे. कृती समितीने सुरू केलेल्या या आंदोलनास विविध ऊस तोड कामगार संघटना, गावातील ग्राम पंचायत, सेवा सहकारी सोसायटी यांनी ठराव मंजूर करत पाठिंबा दिला असून ऊस प्रश्नी पेटलेले हे आंदोलनाबाबत साखर कारखानदारांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र स्वरूप घेऊन जन आंदोलन होईल असे कृती समितीकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT