Beed News : सत्ताधारी जातीयतेचे विष पेरुन दिशाभूल करतील : आ. संदीप क्षीरसागर File Photo
बीड

Beed News : सत्ताधारी जातीयतेचे विष पेरुन दिशाभूल करतील : आ. संदीप क्षीरसागर

इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती, उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी

पुढारी वृत्तसेवा

The ruling party will mislead by sowing the poison of casteism: MLA Sandeep Kshirsagar

बीड, पुढारी वृत्तसेवा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अनुषंगाने बीड व शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गटातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बोलावली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आ. संदीप क्षीरसागर व माजी आमदार सय्यद सलीम यांनी या मुलाखती घेतल्या.

राष्ट्रवादी भवन बीड येथे झालेल्या बैठकीला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. जागे अभावी निम्म्याहून अधिक कार्यकर्ते राष्ट्रवादी भवन परिसरात उभे उभे राहून बैठकीला हजर होते. उपस्थित उत्साही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका मांडताना म्हणाले की, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दी लक्षात घेता विरोधकांना उमेदवार मिळतील की नाही अशी माझ्या मनात शंका आहे.

बीड व शिरूर तालुक्यातील सर्व त्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मी माझ्या भूमिकेशी प्रामाणिक राहिलो याची ही पोहच पावती आहे. कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतली. प्रसंगी जीवाची बाजी लावली. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मी देखील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून साथ देणार आहे. मतदार बंधू निवडणुकीची वाट पाहत आहेत.

परंतु हे सरकार निवडणुका पुढे ढकलून पळ काढण्याच्या मनस्थितीत आहे. आता कोणाची सुट्टी नाही. निश्चितपणे विरोधकांना त्यांची जागा दाखवू. सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक एकजुटीने लढू. जातीयवादाला बळी न पडता आपल्याला पुढे जायचे आहे.

विरोधक मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम जातीयतेचे विष पेरून दिशाभूल करतील. हे सामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही जातीय वादाला बळी न पडता एक दिलाने निवडणूक लढवायची आहे असे विचार आ. संदीप क्षरसागर यांनी मांडले. या बैठकीस ज्येष्ठ नेते डी. बी. बागल, वैजनाथ तांदळे, के. के. वडमारे, शिवराज बांगर, मदन जाधव र, माऊली दादा, हांगे दादा, धनंजय जगताप, मिलन बापू मस्के, बाळासाहेब गोरे, खुर्शीद आलम, यांसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गावागावातील जबाबदार सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT