गर्भगिरीच्या दरीमध्ये दोन मृतदेह आढळले File Photo
बीड

गर्भगिरीच्या दरीमध्ये दोन मृतदेह आढळले

आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक व धक्कादायक घटना उघडकीस आली.

पुढारी वृत्तसेवा

The bodies of two devotees were found in the deep Garbhagiri gorge on the hill near the Machhindranath temple

कडा, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक व धक्कादायक घटना उघडकीस आली. मच्छिंद्रनाथ गडावर देवदर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचे मृतदेह गडावरील खोल गर्भगिरीच्या दरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यातील एका तरुणाचा केवळ सापळा शिल्लक राहिला असून, दुसरा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

गडावरील दुर्गम आणि खोल दरीत काही स्थानिक नागरिक सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांना मानवी अवशेष दिसून आले. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ गावात धाव घेतली. यानंतर अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

दरी अत्यंत खोल व अवघड असल्याने एक मृतदेह कुजलेला तर दुसऱ्याचा केवळ सांगाडा शिल्लक पोलिसांनी मोठ्या शर्थनि मृतदेह बाहेर काढले. तपासादरम्यान दरीत आढळलेला सापळा नीलेश नारायण घोंगरे (वय २६, रा. बेलापूर खुर्द, जि. अहिल्यानगर) याचा असल्याची ओळख पटली. नीलेश हा महिनाभरापूर्वी मच्छिंद्रनाथ गडावर दर्शनासाठी आला होता; मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला होता.

ओळख पटताच कुटुंबीयांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला. दुसरा मृतदेह दिनकर नाना घडशिंग (वय ६५, रा. भिलवाडा, ता. पाथर्डी) या वृद्ध भाविकाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT